भोंगळ कारभार ; कोपरखैरणे मधील  भारत गॅस एजन्सी बंद

कोपरखैरणे : कोपरखैरणे सेक्टर-२ मधील 'विघ्नहर गॅस एजन्सी' चा भोंगळ कारभार भारत गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनात येताच एजन्सी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १ हजाराच्या पलीकडे गेली असताना एजन्सीचे कर्मचारी येथील ग्राहकांना सुविधा पुरवत नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात असल्याने कारवाई करण्यात आली. परंतु या कारवाईमुळे घरगुती गॅस घेण्यासाठी स्थानिक ग्राहकांची एकच झुंबड उडाली. ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांना रिक्षा किंवा मोटरसायकलद्वारे सिलेंडर आणून घरी घेऊन जावा लागत असल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

याशिवाय गॅस बुकिंग करण्यासाठी कार्यालयात येऊनच बुकिंग करावी व घणसोली पाम बीच रोड येथून सिलेंडर उपलब्ध करून दिला जात आहे व दोन-तीन दिवसात ग्राहकांच्या सोयीसाठी दुसरी एजन्सी नेमली जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापे शीळ रस्ता लवकरच  उजळणार