रेल्वे प्रवासी मंडळांच्या भजन स्पर्धा संपन्न

नवी मुंबई ः नवविद्या भवतीसेवा समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे प्रवासी मंडळांच्या भजन स्पर्धांचे १८ डिसेंबर रोजी सानपाडा येथे आयोजन करण्यात आले होते. सानपाडा, सेवटर-५ मधील गायत्री चेतना केंद्र येथे संपन्न झालेल्या सदर भजन स्पर्धामध्ये हार्बर, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणारे २० प्रवासी भजनी मंडळ सहभागी झाले होते.

स्पर्धाप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, गायत्री चेतनाकेंद्राचे विश्वस्त मन्नूभाई पटेल, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, उपशहरप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, उपशहर संघटक तथा माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर, मुंबई पोर्ट ट्रस्ट ॲन्ड जनरल एम्लॉईज युनियनचे पदाधिकारी मारुती विश्वासराव, महादेव पवार, पश्चिम रेल्वेच्या संत सेवा भजन मंडळाचे अध्यक्ष वसंत प्रभू, संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळाचे सचिव जयराम पवार, मध्य रेल्वेच्या विठू माऊली भजन मंडळाचे अध्यक्ष राजेश पालकर, स्पर्धा आयोजक नवविद्या भवती सेवा समितीचे अध्यक्ष आत्माराम सुर्वे,  सचिव विनय धडवे, खजिनदार सुनिल मस्कर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा समयी संस्थेच्या दिनदर्शिका-२०२३चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्यात आभार प्रदर्शन शिवसेना शाखाप्रमुख अजय पवार यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भोंगळ कारभार ; कोपरखैरणे मधील  भारत गॅस एजन्सी बंद