आमदार महेश बालदी यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित

पनवेल: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उरण उपजिल्हा रुग्णालय आणि मोरा सागरी पोलीस ठाणे इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले असून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून हा प्रश्न निकाली लागला आहे. 
 
          या संदर्भात नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्यासोबत सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार महेश बालदी यांच्या विनंतीवरून नुकताच खांदा कॉलनी येथे पार पडली. या बैठीकीस भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, उप विभागीय अधिकारी नरेश पवार, मिलिंद कदम, नवी मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षिरसागर, मोरा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अभिजित मोहिते, उरण ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी.एम.काळेल, शल्य चिकित्सक डॉ.रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र इटकरी, नितीन वरकुटे  आदी अधिकारी उपस्थित होते. 
 
उरण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी २०१८ साली फडणवीस सरकारच्या कार्यकाळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि सदरचे काम सीआरएस फ़ंडातून करण्यात होणार येणार होते. मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सन २०२२ पर्यंत या कामाला मुहूर्त लागला नाही. त्याचबरोबर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम हे अंशदान योजतंर्गत मंजूर असल्याने या कामास वाढीव निधीची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही विषयासंदर्भात आमदार महेश बालदी यांनी पाठपुरावा कायम ठेवला. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या कामाला गती मिळणार असल्याने आमदार महेश बालदी यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नामदार रवींद्र चव्हाण यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तांत्रिक अडचणी दूर करण्यास सांगून काम तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आणि या इमारतींच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासित केले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी गांव येथे महाआरोग्य शिबिरात ८०० जणांची तपासणी