उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज : आज मतदान

उरण : उरण तालुक्यात  रविवार दि.18 डिसेंबर 2022 रोजी  होत असलेल्या 17 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यांच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात ठिकठिकाणी रवाना करण्यात आले असल्याची माहिती उरणचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे. उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या मतदान प्रक्रियेसाठी 61 मतदान केंद्र आहेत.या 61 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पाडण्यासाठी 366 कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 शनिवारी 17 डिसेंबर 2022 रोजी  उरण तालुक्यातील पाणजे,डोंगरी,नवीनशेवा,बोकडविरा,भेंडखळ, नवघर, पागोटे, जसखार, करळ, धुतुम, चिर्ले, रानसई, कळंबुसरे,पिरकोन, सारडे, वशेणी व पुनाडे  आदी 17 ग्रामपंचायतीमध्ये मतदान यंत्रासह  मतदान साहित्य  पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आलेअसून,कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एका पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून, उरण तालुक्यातील या 17 ग्रामपंचायतींच्या थेट  सरपंच व सदस्यांच्या निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती उरणचे  तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आमदार महेश बालदी यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित