आंतर महाविद्यालयीन व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

खारघर:  अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, साहित्य संस्कृती व कला मंडळ आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथील साहित्य मंदिरात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतर महाविद्यालयीन व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धा नुकताच पार पडल्या. या स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई,  शहापूर व उल्हासनगर, कामोठे, ज्ञानसाधना ठाणे अशा अनेक महाविद्यालय सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेत विद्यार्थांनी व्यसनांच्या समस्येबरोबरच या प्रश्नावर ठोस उपाययोजना अनेक महाविद्यालयांनी आपल्या पथनाट्यातून प्रभावीपणे मांडल्या.या स्पर्धेत प्रथम क्रमांक एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर, द्वितीय क्रमांक सोनू भाऊ बसवंत कला आणि वाणिज्य महाविद्यालय शहापूर आणि तृतीय क्रमांक सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज ठाणे यांनी पटकावले. यावेळी 'येस माय डियर, 'संगीत स्वयंवर' तसेच 'घायाळ' अशा नाटकात विविध भूमिका केलेल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिका कविता विभावरी तसेच नवरी मिळे नवऱ्याला' या मालिकेतून, चित्रपट आणि नाटकात अभिनय  करणारे अभिनेता, कवी, आणि 'पीयूष बबेले' लिखित 'नेहरू: मिथक और सत्य' या पुस्तकाचे  मराठी अनुवादक  अक्षय शिंपी हे दुसरे परीक्षक म्हणून काम पहिले. 
 
       बक्षीस वितरण प्रसंगी डॉक्टर अजित मगदूम यांनी आपल्या मनोगतात देशातील सध्याच्या व्यसनांची स्थिती आणि युवकांची अपेक्षित भूमिका याविषयी भाष्य केले. दोन्ही परीक्षकांनी सादर केलेल्या पथनाट्यंचे अतिशय परखड विश्लेषण करून पथनाट्य या अत्यंत प्रभावी नाट्य प्रकाराविषयी मोलाचे मार्गदर्शन केले केले. ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अत्यंत भावले.विजेत्या संघांना प्रा.अश्विनी बाचलकर,डॉ अजित मगदूम  व सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. मंडळाच्या कार्यकारिणी सदस्या अमरजा चव्हाण  यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय तिळवे यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी  मधुकर राऊळ, माधव ठाकूर तर अन्वयचे कार्यकर्ते अनिल लाड, मुक्ता महापात्रा, मल्लिका सुधाकर, वृषाली मगदूम, जीवन निकमआदी उपस्थित होते .स्पर्धा  सुभाष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रीजवर प्रतिबंध महत्वाचे -राजेश नार्वेकर