शरद पवार यांच्या वडिलांपासून तीन पिढ्या रयत शिक्षण संस्थेच्या मागे खंबीरपणे उभे - अनिल पाटील
देशाला जगात पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवणे आवश्यक - डॉ. अनिल काकोडकर
नवी मुंबई : - भारत देशाला जर जगात पुढे न्यायचे असेल तर येथील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकवणे आवश्यक आहे.असे मत अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी.वाशी येथे व्यक्त केले.रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीने खासदार शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतज्ञता सप्ताहाचा समारोप आणि विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
आपल्या देशात आधी शहर आणि ग्रामीण भागात असलेली आर्थिक विषमता दूर करण्यासाठी ग्रामीण भागात काम करणे आवश्यक आहे. रयत शिक्षण संस्थेचे शिक्षण देण्याचे योगदान या भागात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संस्थेच्या या कामाविषयी मला खूप आस्था आहे. इस्रायल, स्वीडन या देशांपेक्षा आपल्या देशात संशोधनावर अधिक खर्च होतो. तरीही आपल्या देशात तुलनात्मक दृष्ट्या अल्प संशोधन होत असते. याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीत असल्याचे लक्षात आल्यावर संशोधन करणाऱ्या शिक्षण संस्था चालू करण्यात आल्या आहेत. भविष्यात यात वृद्धि होण्याची आवश्यकता असल्याचेडॉ. अनिल काकोडकर म्हणाले .यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार बाळाराम पाटील, नवी मुंबई मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार यांच्या वडिलांपासून तीन पिढ्या रयत शिक्षण संस्थेच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. रयत मध्ये साडे चार लाख मुल शिकत असून आता बजेट १३०० कोटींचे झाले आहे. देशात सर्वात मोठी क्लस्टर युनिव्हर्सिटी रयत शिक्षण संस्थेची आहे. १५०० मुले एमपीएससीला सिलेक्ट झाले आहेत. अनिल पाटील, अध्यक्ष,रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष