नवी मुंबईत मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याची मागणी

नवी मुंबई ः विद्यार्थ्यांना जे शिक्षण हवे आहे ते शिक्षण आपण राहत असलेल्या ठिकाणीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगानेच नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या कोर्सेस तसेच अन्य अभ्यासक्रमासंबंधीची गरज लक्षात घ्ोऊन मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र नवी मुंबईतही सुरु करण्याविषयी योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊ, असे
प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे केले.

नवी मुंबई, खारघर, पनवेल, उरण, पनवेल, अलिबाग तसेच तळ कोकणातील हजारो विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठातून शिक्षण घ्ोतात. परंतु, मुंबई विद्यापीठापासून सदरचे अंतर फारच दूर असल्याने पैशांचा आणि वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होते. विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठीच मुंबई विद्यापीठाने ठाणे आणि कल्याण येथे उपकेंद्र सुरु केले आहेत. याच निकषावर नवी मुंबईतही मुंबई विद्यापीठाने उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन नवी मुंबईतील ‘शिवछाया मित्र मंडळ'चे अध्यक्ष अंकुश वैती यांनी १५ डिसेंबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन दिले.

राजभवन मधील राज्यपालांच्या दालनात झालेल्या सदर भेटीप्रसंगी डॉ.के.एस.पनवर, साहित्यिक अमृत पाटील, समाजसेवक गजानन दळवी, किशोर घोटकर, विद्यार्थी प्रतिनिधी सिध्दांत वैती, आदि उपस्थित होते.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शिरवणे गावातील अंगणवाडी इमारत धोकादायक