जलकुंभातील पाणी साठा क्षमता घणसोली भागातील वाढत्या नागरिकांच्या तुलनेत अपुरी

नवी मुंबई: माजी नवी मुंबई महापालिका परिवहन समिती सभापती दिलीप म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना घणसोली प्रभाग क्रमांक-२९ मधील समस्यांचे निवेदन दिले आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप म्हात्रे यांनी  महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात घणसोली गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. 

घणसोली गावातील महापालिका विभाग कार्यालय शेजारी असलेला जुना जलकुंभ पूर्ण जीर्ण झाला असून, या जलकुंभावर घणसोली गावातील बहुतांश भागातील नागरिक पाणीपुरवठावर अवलंबून आहेत. या जलकुंभातील पाणी साठा क्षमता घणसोली भागातील वाढत्या नागरिकांच्या तुलनेत अपुरी पडत आहे. त्यामुळे  नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जुना जीर्ण झालेला जलकुंभ तोडून त्या जागी नवीन भूमिगत पध्दतीचा आणि उच्च स्तरीय जलकुंभ बांधण्यात यावा  तसेच घणसोली प्रभाग क्रमांक-२९ येथे पाण्याची टाकी आहे.या पाण्याच्या टाकी मध्ये मुख्य जलवाहिनीत स्वतंत्र 

असे निवेदन जलवाहिनी नसल्यामुळे पाण्याचा दाब कमी येत आहे. यामुळे पाण्याच्या टाकी मध्ये पाणी कमी येत असल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा कमी पडत आहे. सदर ठिकाणी मुख्य जलवाहिनी मोरबे लाईन ते घणसोली गावातील पाण्याच्या टाकी पर्यंत सलग आणि स्वतंत्र जलवाहिनी लवकरात लवकर टाकण्यात यावी, असे दिलीप म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांपर्यंत पोहोचून स्वच्छता, प्लास्टिक प्रतिबंधाबाबत जनजागृती