७ संचालकांच्या अपात्रेतेला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती

एपीएमसी संचालकांच्या सुनावणीस तारीख पे तारीख

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुदत संपलेल्या  ७ संचालकांच्या अपात्रेतेला मुख्यमंत्री व पणन मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होई पर्यंत स्थगिती दिली आहे.यावर गुरुवार दिनांक १५ डिसेंबर रोजी  सुनावणी होती.मात्र ही चौथी  सुनावणी देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीस तारीख पे तारीख मिळत असल्याने अपात्र ठरवलेल्या या संचालकांना दिलासा मिळत आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा महसुल विभागातून प्रत्येकी २ असे १२ शेतकरी प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले होते. त्यापैकी ७ जणांची त्यांच्या स्थानिक बाजारपेठेतील मुदत संपली. त्यामुळे एपीएमसी नियमांनुसार ज्या बाजार समितीतील. संचालकांची मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी पद रद्द होते. आणि हे पद रद्द झाले तर एपीएमसी मध्ये हे सदस्य संचालक पदासाठी अपात्र ठरतात. आघाडी सरकारच्या कार्यकाळात मे महिन्यातच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या या ७ संचालकांचे संचालक पद पणन संचालक यांनी रद्द केले होते. ज्या ७ संचालकांचे पद रद्द झाले होते यामध्ये माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे),बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा),वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे),जयदत्त होळकर (निफाड नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या ७ संचालकांनी पणन मंत्र्यांना पत्र दिले होते.यात त्यांनी आपली बाजू मांडत  आम्हाला पाच वर्षासाठी मान्यता दिली आहे . सन २०२०-२०२५पर्यंत आम्ही पात्र आहोत तरी देखील अपात्र का ?ठरविण्यात आले आहे. याबाबत आम्हाला ५२ बी अधिनियमाअंतर्गत सूट द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. यावर पणन मंत्री एकनाथ शिंदे यांनी  पुढील सुनावणी पर्यत अपत्रतेच्या आदेशाला स्थगिती दिली होती.मात्र पणन मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील सुनावणी ७ ऑक्टोबर ते  १५ डिसेंबर या दरम्यान चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अपात्र ठरवलेल्या या संचालकांच्या सुनावणीस तारीख पे तारीख मिळत असल्याने या संचालकांना दिलासा मिळत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी रेल्वे स्टेशन वरुन रेल्वेने प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव