वाशी रेल्वे स्टेशन वरुन रेल्वेने प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव

वाशी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे प्रवासी नागरिकांसाठी विविध पायाभूत सुविध कामे

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका सौ. वैजयंती भगत, युवा नेते निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली पामबीच-सानपाडावासियांनी केलेल्या आंदोलनाची ‘सिडको'तर्फे दखल घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वाशी रेल्वे स्टेशन पूर्वेकडे सिडको मार्फत प्रवासी आणि नागरिकांसाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामांचे भूमीपुजन १५ डिसेंबर रोजी संपन्न झाले.

वाशी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील सानपाडा-पामबीच वसाहतीतील सेवटर-१, १३ ते १९ या नऊ सेक्टर्स मधील नागरिकांना वाशी रेल्वे स्टेशन वरुन रेल्वेने प्रवास करताना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने याविरोधात काही महिन्यांपूर्वी दशरथ भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ. वैजयंती भगत यांनी सिडको भवन समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी या उपोषणाला उपस्थित राहून आ. गणेश नाईक यांनी पाठिंबा देऊन येथील मागण्या मान्य होतील, असे आश्वासित केले होते. त्यानुसार सदर आंदोलनाची दखल सिडको प्रशासनाने घ्ोऊन येथील पायाभूत सुविधांची कामे ज्यामध्ये डांबरी रस्ता, गटार आणि पदपथ विकसित व्ोÀली जाणार आहे. सदर विकास कामांचे भूमीपुजन १५ डिसेंबर रोजी सानपाडा सोनखार पामबीच विभागातील नागरिकांच्या उपस्थितीत दशरथ भगत आणि माजी नगरसेविका वैजयंती भगत यांच्या हस्ते करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विद्यार्थीदशेपासूनच नवी मुंबईतील मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी यासाठी कचरा वर्गीकरणाचे संस्कार