पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीस लागण्याच्या दृष्टीने प्रयत्न - पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे

 

नवी मुंबईला अधिक सुरक्षित व शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करु-पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे

नवी मुंबई : नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून नवी मुंबई शहराला अधिक सुरक्षित व शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नवी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याशिवाय शहरातील वाढते सायबर गुन्हे रोखण्याबरोबरच महिलांच्या संदर्भातील गुन्हे,अमली पदार्थांच्या कारवाया, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीस लागण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलिस महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले मिलिंद भारंबे यांची नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर बुधवारी त्यांनी मावळते पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्याकडून पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी मावळते पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन नवी मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि इतर गोष्टींचा आढावा घेतला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७ संचालकांच्या अपात्रेतेला पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती