बसेसची वाहतूक, परिचलनासाठी चाचपणी करण्याची महापालिका आयुवतांची सूचना
‘एनएमएमटी'तर्फे चालविणार डबलडेकर बस
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमार्फत (एनएमएमटी) डबलडेकर बस घेण्याचे नियोजन आहे. डबल डेकर बस कोणत्या बसमार्गांवर चालविणार याची सविस्तर माहिती घेतानाच त्या बसेसची वाहतूक आणि परिचलन योग्य रितीने करता येईल असे मार्ग निवडावेत. तसेच मार्गे निवडताना जास्तीत जास्त प्रवाशांना लाभ होईल अशा मार्गांची निवड करावी, अशा सूचना महापापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहे. दरम्यान, एनएमएमटी दररोज २.५ लाखाहुन अधिक नागरिकांना प्रवाशी सेवा पुरवित असून ती प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सुविधाजनक व्हावी याकरिता सकारात्मक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिवहन उपक्रमाचे साध्य नफा कमाविणे नसले तरीही होणारा तोटा कमीत कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही आयुक्त नार्वेकर यांनी दिले.
बेलापूर भवन येथील एनएमएमटी मुख्यालयातील कार्यपध्दतीची तसेच ‘आयटीएमएस अर्थात इंटीग्रेटेड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम'ची आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत ‘एनएमएमटी'च्या ५६७ बसेस ७६ बस मार्गांवर कार्यरत असून तुर्भे, आसुडगांव आणि घणसोली येथील ३ आगारांमधून या बसेसचे दैनंदिन परिचलन होते. या परिचलनामध्ये कोणत्या आगारातून दैनंदिन किती बसेसचे परिचलन होते, त्यामध्ये स्वतःच्या बसेस तसेच जीसीसी तत्वावरील बसेस किती, त्याचप्रमाणे सर्वसाधारण बसेस, सीएनजी बसेस, व्होल्वो बसेस, इलेक्ट्रिक बसेस अशा सर्व प्रकारच्या बसेसच्या परिचलनाची आयुवतांनी बारकाईने माहिती घेतली. यामध्ये खोपोली, कर्जत, रसायनी, उरण, फोर्ट, बोरीवली, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध मार्गांवर प्रवासी सेवा पुरवित असताना किफायतशीर अर्थात कमी तोटा असणारे बस मार्ग कोणते याचीही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
केंद्र सरकारच्या फेम इंडिया-१ योजना अंतर्गत ३० इलेक्ट्रीकल बसेस अनुदानाद्वारे उपलब्ध करुन घ्ोण्यात आल्या असून फेम इंडिया-२ योजना अंतर्गत जीसीसी तत्वावर १५० इलेक्ट्रीकल बसेस चालविण्यात येत आहेत. यामध्ये वाढ करण्याची कार्यवाही करावी त्याचप्रमाणे फेम-२ योजना अंतर्गत २० ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या चार्जींग स्टेशन कार्यान्वित करण्याच्या कामाला गती द्यावी. वाशी येथील बस डेपोचा वाणिज्यिक तत्वावर होणारा विकास ‘एनएमएमटी'चा तोटा भरुन काढणारा असून ते काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाहीकडे लक्ष द्यावे, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले.
परिवहन उपक्रमाकडे १० महिला स्पेशल तेजस्विनी बसेस असून ६४ महिला कंडक्टर आणि १ महिला ड्रायव्हर आहे. यापुढील काळात महिला ड्रायव्हर यांना प्राधान्य देऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उपक्रमाने सकारात्मक पाऊल टाकावे, अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.
एनएमएमटी उपक्रमामधील कायमस्वरुपी तसेच रोजंदारीवरील आणि कंत्राटी स्वरुपातील कर्मचारीवर्गाची संर्वगनिहाय माहिती जाणून घेताना इतर परिवहन सेवांच्या तुलनेत ‘एनएमएमटी'चा प्रतिबस कर्मचारी मानांक इतरांपेक्षा बराच कमी ५.५८ इतका असल्याबद्दल आयुवत नार्वेकर यांनी समाधान व्यक्त केले. सर्व बसेसमधील जीपीएस प्रणाली सुरु राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आणि त्याचे विशिष्ट पथकाद्वारे परीक्षण करण्याचे निर्देश दिले. या प्रणालीकरिता सध्या टू जी नेटवर्क वापरले जात असून त्याचे अद्ययावतीकरण करावे, असेही आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.
वाहतुकीवरील खर्च कमी करण्यासाठी १२ बसेस रात्री मुक्कामी थांबवून कि.मी. धाव वाचविली जात आहे. यामुळे ११८१.८० कि.मी. ची दैनंदिन बचत होऊन मासिक ११ लाख रक्कमेची बचत होत आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक बस मुक्कामी ठेवण्याबाबत सर्वेक्षण करावे. याशिवाय शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात डिझेल बसेस ऐवजी इलेक्ट्रीक बसेस चालवून इंधन बचत केली जाते, त्या इलेक्ट्रिक बस संख्येमध्येही वाढ करण्याबाबत चाचपणी करावी. प्रवाशांना त्यांच्या नजिकच्या बस थांब्यापासून हव्या असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्या किती वेळात त्यांच्या थांब्यावर येणार आहेत याची माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या मोबाईल ॲपची संपूर्ण माहिती करुन घेतानाच एकाच कार्डवर कोणत्याही स्वरुपाच्या प्रवासाचे तिकीट काढता येऊ शकेल असे एनसीएमसी कार्ड उपलब्ध करुन देण्याविषयी पाठपुरावा करण्याच्या सूचना आयुवत राजेश नार्वेकर यांनी केल्या. तसेच आयुक्तांनी त्याक्षणी बस मार्गांवर धावत असलेल्या बसेसचे लाईव्ह ट्रॅकींग करणाऱ्या आयटीएमएस प्रणालीची पाहणी केली. यामध्ये काही बसेसची त्या त्या मार्गांवरील सद्यस्थिती जाणून घेतली.