प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावरील साठा जप्त

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना नवी मुंबईत गती

नवी मुंबई ः प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला असलेला धोका लक्षात घ्ोऊन प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर पूर्णपणे रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधी मोहिमा तीव्रतेने राबवाव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिले होते. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ-१चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ-२चे उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली सर्वच आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि विभागातील स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा गतिमानतेने राबविण्यास सुरुवात झाली आहे.

नुकतीच १० डिसेंबर रोजी तुर्भे येथे १२०० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या आणि प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावरील साठा जप्त करण्यात आला. ऐरोली, सेक्टर-३ आणि २० येथील ७ खाद्यपदार्थ दुकानदारांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ४० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. यामधील एका दुकानदारावर दुसऱ्यांदा कारवाई होत असल्याने १० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे कोपरखैरणे, सेक्टर-३ आणि २० येथील ४ दुकानदारांवर कारवाई करीत २० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. नेरुळ, सेक्टर-४ येथील व्यावसायिकाकडून ५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर-३ येथील ४ दुकनदारांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने दंड वसूल करण्यात आला. घणसोली येथेही एका व्यावसायिकाकडून ५ हजार रुपये दंड रक्कमेसोबतच त्याच्याकडील १० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

अशाप्रकारे सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक पिशव्या आण प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व्यावसायिक, व्यापारी यांच्याप्रमाणेच नागरिकांनाही आवाहन करण्यात येत आहे. त्यासोबतच धडक मोहिमा राबवित प्रतिबंधात्मक प्लास्टिक आढळल्यास प्लास्टिक जप्तीप्रमाणेच दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात येत आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बसेसची वाहतूक, परिचलनासाठी चाचपणी करण्याची महापालिका आयुवतांची सूचना