वाहतूक कोंडी मुळे होते वादावादी ,पार्किंग भूखंड मोकळा रस्ते चक्काजाम

पनवेल : खांदेवेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या जागेत ,रस्त्यावर ,जागा मिळेल तिकडे वाहने बेशिस्तपणे पार्किंग करून वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडी मुळे सकाळी संध्याकाळी, वर्दळीच्या वेळी  वादावादी होऊन हाणामारीचा घटना रोज घडत असल्याने या स्थानकासमोरील बेकायदेशीर पार्किंग नागरिकांसाठी डोके दुखी ठरत असल्याने वाहतूक विभाग ,कामोठे पोलीस स्टेशन ,सिडकोने कारवाई करण्याची  मागणी नागरिकांकडून होत आहे .

मुंबईतील नोकरदार कामोठे ,खांदा कॉलनी ,कळंबोली ,रोडपाली येथील नागरिकांसाठी खांदेश्वर रेल्वे स्थानक हे प्रवासासाठी सोईस्कर  स्थानक असल्याने रोज हजारो प्रवासी खांदेश्वर स्थाकावरून रेल्वे ने प्रवास करतात ,आपली दुचाकी ,चारचाकी वाहने  खांदेश्वर स्थानकासमोर कुठेही मोकळी जागा मिळेल त्या ठिकाणी पार्क करून आपल्या कामासाठी जातात मात्र अस्ताव्यस्त ,बेशिस्तपणे पार्किंग करण्यामुळे मुख्य वर्दळीच्या वेळी या ठिकाणी वादावादी होऊन हाणामारीच्या घटना रोजच घडत आहेत  यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे .भविष्यात  यातून एखादी मोठी जीवित हानी होऊ शकते ,काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक अज्ञात इसमाने खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील चाळीस पेक्षा अधिक वाहने जाळली होती .मुख्य म्हणजे या स्थानकासमोर सिडकोने वाहनतळासाठी  भूखंड देखील मंजूर केला आहे ,मात्र त्या ठिकाणचे नाममात्र शुल्क वाचवण्यासाठी नागरिक आपली लाखो रुपये किमतीची वाहने वाहन तळात  पार्क न   करता अन्यत्र मोकळ्या जागी करतात या मुळे येथील संध्याकाळच्या वेळेची वाहतूक कोंडी हि नित्य नेमाची झाली आहे . संध्याकाळी आणि वर्दळीच्या वेळी  बेशिस्थ पार्किंग मुळे संध्याकाळच्या वेळेत कामावरून घरी येणाऱ्या  नागरिकांना चालायला हि जागा मिळत नसल्याने सगळी वाहने वाहनतळात पार्किंग करायला लावून रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडुन जनजागृती मोहीम