धनराज गरड यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपूष्ठात येऊन देखील ते मनपा सेवेत कार्यरत
मुख्य लेखाधीकारी धनराज गरड यांना कार्यमुक्त करा
नवी मुंबई -: नवी मुंबई महानगर पालिकेचे मुख्यलेखा व वित्त अधीकारी धनराज गरड यांचा प्रतीनीयुक्ती कालावधी संपुष्टात आला आहे. तरी देखील महापालिकेत अजून हि गराडा घालून आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ मनपा सेवेतून कार्यमुक्त करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचा कडे केली आहे.
धनराज गरड हे मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर नवी मुंबई महानगरपालिका सेवेत दि.०८/०८/२०१५ पासून कार्यरत आहेत. त्यांचा प्रतिनियुक्ती कालावधी संपूष्ठात येऊन देखील ते मनपा सेवेत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सेवा प्रवेश नियमानुसार प्रतिनियुक्ती कालावधी संपूष्टात आल्यानंतर संबधीत अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका सेवेतुन कार्यमुक्त झाल्याचे समजण्यात येईल त्यामुळे धनराज गड हे सध्या बेकायदेशिररित्या नवी मुंबई महानगरपालिका सेवेत कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य, नगर विकास विभाग शासन निर्णय २०१६ अन्वये एखाद्या अधिका-यास त्याच्या पूर्ण सेवा कालावधीमध्ये १० वर्षापेक्षा जास्त प्रतिनियुक्तीवर जाता येणार नाही. धनराज गरड गेल्या २० वर्षापासुन त्यांच्या मुळ विभागात काम न करता बेकायदेशिररित्या प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून त्वरीत कार्यमुक्त करावे.अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचा कडे केली आहे