नेरूळ स्टेशन परिसरात दारू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात वाढ

नेरूळ स्थानक परिसरराला गर्दुल्ले,मद्यपी, अवैध फेरीवाल्यांचा विळखा

नवी मुंबई -: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात गेली बरेच दिवस झाले मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फळ, भाजी व इतर वस्तू विक्रेते यांचे अतिक्रमण, गर्दुल्यांचा वावर असेल तसेच त्यांच्या मार्फत या भागात दारू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थांची होणारी विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच येथील वाईन शॉप मुळे उघड्यावर मद्यपान करणाऱ्या नागरिकांची संख्या राजरोजपणे वाढत चालली आहे त्यामुळे तेथून दररोज प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे आणी  सहसचिव अभिजीत देसाई  यांनी  गेल्या दोन महिन्यांपूर्वी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती .मात्र या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.त्यामुळे हा वाढता प्रकार लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त तसेच सिडको प्रशासन आणी नेरूळ पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक व नार्कोटिक्स विभाग यांनी यांनी या ठिकाणी संयुक्तिक कारवाई करावी अशी मागणी मनसेचे अभिजित देसाई व  सविनय म्हात्रे यांनी निवेदन देऊन केली आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बारा वर्षापासून प्रकल्पग्रस्त भूखंडाच्या प्रतीक्षेत