शिवाजीराव पाटील उद्यानात सायंकाळच्या वेळेस दिवे बंद स्थितीत

नवी मुंबई ः घणसोली, सेवटर-५ मधील श्री. शिवाजीराव अण्णासाहेब पाटील उद्यानातील दुरावस्था सात दिवसात दूर करण्यात यावी. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या वतीने महापालिका विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

घणसोली, सेवटर-५ येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कै. श्री. शिवाजीराव आण्णासाहेब पाटील उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. या उद्यानात दररोज सायंकाळी लहान मुले खेळण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर येथे वृध्द व्यक्तींचा देखील मोठ्या संख्येने राबता असतो. विशेषतः सायंकाळी या उद्यानात लोकांची ये-जा वाढलेली असते. या उद्यानात सायंकाळच्या वेळेस जर पाहणी केली तर उद्यानात लावण्यात आलेले दिवे बंद स्थितीत असतात. पाण्याच्या टाकीत पाणी आहे; मात्र टाकीला नळ नाही. उद्यानात साफसफाई दररोज केली जात नाही, ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. एकंदरीतच या उद्यानातील दुरावस्थेबाबत महापालिकेच्या घणसोली विभाग अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे.

त्यानुसार येत्या ७ दिवसात कै. श्री. शिवाजीराव आण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये समाधानकारक काम न झाल्यास ‘मनसे'च्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासन असेल, असा इशारा महाराष्ट्र सैनिक आकाश साळेकर, अतुल देसाई, आकाश पवार, आदिंनी निवनाद्वारे महापालिकेला दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरूळ स्टेशन परिसरात दारू, गांजा, चरस अशा अंमली पदार्थ विक्री मोठ्या प्रमाणात वाढ