बेलापूर मध्ये मेरीटाईम बोर्ड तर्फे पहिल्यांदा पलेमिंगो बोट सुरु

ऐरोली मधील पलेमिंगो बोटींग सेवा सुरु होण्याची प्रतिक्षा

वाशी ः ऐरोली मध्ये सागरी किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी पक्षीप्रेमींना पलेमिंगो पक्षी पाहता येण्यासाठी बोटींग सुविधा उपलब्ध आहे. मात्र, ऐरोली खाडीत पलेमिंगो दाखल झाले असून देखील येथील बोटींग सेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटक पलेमिंगो बोटींग सफरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे बेलापूर मध्ये मेरीटाईम बोर्ड तर्फे पहिल्यांदा पलेमिंगो बोट सुरु करण्यात आली असून, या बोटची सफर २ डिसेंबर पासून सुरू करण्यात आली आहे.   

  नवी मुंबई शहराला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला आहे. या खाडी किनाऱ्यावर मोठी जैव विविधता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने पलेमिंगो पक्षी दाखल होत असतात. ठाणे खाडी आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटर लांबीच्या ठाणे खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी स्थलांतर करीत असतात. पलेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही नोव्हेंबर मध्ये खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील पर्यावरण प्रेमींना खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती, किनाऱ्यांचे संरक्षण, पक्षीनिरक्षण कसे करावे यासाठी वन खात्यामार्फत बोटींग सेवा सुरु करण्यात आली आहे. बोटीने खाडीकिनारी सफर नोव्हेंबर महिन्यात सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप थंडीचा मौसम कमी असल्याने पलेमिंगो पक्ष्यांचे आगमन उशिराने झाले आहे. मात्र, ऐरोली येथील बोटिंग सफर अद्याप सुरु झाली नसून बोटिंग सफर सुरु होण्याच्या प्रतिक्षेत पर्यटक आहेत. दुसरीकडे बेलापूर मध्ये मेरीटाईम तर्फे पहिल्यांदा पलेमिंगो बोट सुरु करण्यात आली आहे.   

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी येथे शहरातील पत्रकारांनी दडपशाही विरोधात आंदोलन