वाशी येथे शहरातील पत्रकारांनी दडपशाही विरोधात आंदोलन

नवी मुंबई -:उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्यावर शाई फेकल्यांनंतर या विरोधात पिंपरी चिंचवड येथील पत्रकारावर ठपका ठेवून पोलिसांनी अटक केली. या अटकेने पत्रकारांनी यंत्रणेच्या दडपशाही विरोधात आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. वाशी येथे शहरातील पत्रकारांनी दडपशाही विरोधात वाशी येथे आंदोलन केले 

वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध करण्यासाठी पत्रकार मोठया संख्येने सहभागी झाले. शासन यंत्रणेचा वापर करून पत्रकारांची मुस्कटदाबी करत आहे. लोकशाही मार्गाने लिहिण्याचे बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हे आंदोलन असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.या आंदोलनात सहभागी पत्रकारांनी हे आंदोलन कोणा एका नेत्यांविरोधात नसून प्रवृत्ती विरोधात असल्याचे स्पष्ट केले.यानंतर पत्रकारांच्या शिष्ट मंडळाने कोकण महसूल विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांची भेट घेवून निवेदन दिले.शासनाकडे याबाबत पत्रकारांच्या भावना पोहोचवण्यात याव्या अशी मागणी पत्रकारांनी केली. यानंतर कोकण विभाग माहिती जनसंपर्क उप संचालक डॉ.गणेश मुळे यांची भेट घेवून त्यांना देखील पत्रकारांच्या भावना शासनाकडे पोहोचविण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.यानंतर थेट पोलिस आयुक्त बिपिन कुमार यांच्या कडे निवेदन सोपवण्यात आले . नेमका घडलेला प्रकार जाणून घेत पोलीस आयुक्तांनी पत्रकारांच्या भावना समजून घेत याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासित केले.या आंदोलनात विविध वृत्तपत्रे वृत्तवाहिन्या आणि पोर्टल न्युजचे पत्रकार सहभागी झाले होते .याबाबत लवकरच मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सर्व पक्षीय नेत्यांना निवेदन दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वच्छता मोहिमा तसेच स्वच्छता विषयक जनजागृतीपर कार्यक्रमात नागरिकांचा उत्साही सहभाग