श्री दत्त जन्मोत्सव सोहळा निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

सानपाडा येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

नवी मुंबई ः सानपाडा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या साजरा केला जाणार आहे. मौजे सानपाडा देवस्थान ट्रस्टच्या श्री दत्त जयंती सोहळ्यास ३० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत ज्येष्ठ ग्रामस्थ दगडू वास्कर यांनी श्री गुरुचरित्र पारायण वाचन केले. उत्सव काळात दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेत काकड आरती आणि दररोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ-आरती तर ३ ते ६ डिसेंबर पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भजन आणि रात्री ९ ते १०.३० या वेळेत किर्तन पार पडले. किर्तनावेळी महिला वर्ग तल्लीन होऊन गाताना दिसला.

श्री दत्त जयंतीचा मुख्य सोहळा ७ डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी सकाळी ५ वाजता सुवर्ण पादुकांवर ग्रामस्थ अमित भोईर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानंतर गुरुचरित्र पारायण समाप्ती होऊन सकाळी ७ ते ८ या वेळेत हरिपाठ झाले. तर श्री दत्त मंदिरात सकाळी ९ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत विविध मंडळांकडून भजन सादर होणार आहे. मुख्य सोहळ्यात सायंकाळी हभप उल्हास महाराज सुर्यवंशी (आळंदी) श्री दत्त जन्माचे किर्तन सादर केले. यानंतर महिला मंडळाच्या सदस्यांनी पाळणा गीत गायले. यानंतर सायंकाळी सुवर्ण पादुकांवर अभिषेक करण्याचा मान ट्रस्टचे खजिनदार प्रकाश ठाकूर यांना मिळाला. रात्री ९.३० वाजता नंतर पालखी सोहळा फवत मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली.

दरम्यान, ठाणे-बेलापूर पट्टीतील सर्वात मोठ्या अशा सानपाडा येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्ोतला. तर श्री दत्त जयंती निमित्त सानपाडा मधील गांवदेवी मैदानात जत्रा देखील भरविण्यात आल्याची माहिती सानपाडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदानंद पाटील यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सैनिकांच्या कुटूंबाप्रती कृतज्ञता असली पाहिजे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे