फुंडे हायस्कुलच्या पंच्याहत्तरीतील माजी विद्यार्थ्यांची नढाळ यात्रा

नवी मुंबई ः उरण तालुक्यातील फुंडे हायस्कुलचे १९६४ सालचे माजी विद्यार्थी मागील ४० वर्षापासून दरवर्षी सहल काढत आले आहेत. या सहलीमध्ये वर्ग मित्रांच्या पत्नीचाही सहभाग राहिला आहे. यावर्षी पंचायतन नढाळ येथे सहल काढण्यात आली. त्यामध्ये ४९ जणांचा सहभाग राहिला. यावेळी ई. एच. ठाकूर यांनी बासरी वादन करुन आपल्या वर्गमित्रांना मंत्रमुग्ध केले. तर काही मित्रांनी आपले अनुभव सांगितले. रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील, जयवंत पाटील, रोहिदास पाटील, नर्मदा म्हात्रे, महादेव घरत, बी. डी. पाटील यांनी आपले विचार मांडले. प्रमुख अतिथी ॲड. गोपाळ  शेळके यांनी शेळके ब्रदर्स तर्फे धनाजी भोईर आणि प्रा. एल. बी. पाटील यांचे सत्कार केले. वयोवृध्द वर्ग मित्रांचे कौतुक करुन प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले.

प्रकाश घरत यांनी शेलू कर्जत येथे आमंत्रित करुन वर्ग मित्रांना सन्मानित केले. यावेळी दिवंगत मित्र आणि दिवंगत नातेवाईक यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. महिलाध्यक्ष सिताबाई कडू, रामदास म्हात्रे, शंकर कडू,
पांडुरंग घरत, गंगाधर म्हात्रे, शंकर पाटील, भरत तांडेल यांनी सहलीची जबाबदारी पार पाडली. भूषण ठाकूर यांनी सहलीच्या सुयोजनामध्ये मोलाची मदत केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्री दत्त जन्मोत्सव सोहळा निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ