स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे आयोजन

नवी मुंबई : गोल्डक्रेस्ट हाय, वाशी, नवी मुंबई यांनी २१ ऑरगॅनिकच्या संयुक्त विद्यमाने फेअरट्रेड उपक्रमाबद्दल स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे आयोजन केले होते. 3 डिसेंबर व 4 डिसेंबर असे दोन दिवस आयोजित केलेल्या या फेअरट्रेडचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळवून देण्यासाठी ताजी, आरोग्यदायी आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली फळे आणि भाजीपाला खरेदी करण्यास उत्सुक असलेल्या स्थानिक व्यापाऱ्यांना व ग्राहकांना प्रोत्साहित करणे हा उद्दिष्ट होता.

ऑरगॅनिक फार्मर्स मार्केट चे उद्घाटन सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार राजन विचारे ह्यांनी भूषविले. सर्व मान्यवरांचे स्वागत मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अमित विलासराव देशमुख आणि गोल्डक्रेस्ट ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रमुख आदिती देशमुख यांनी केले.

"असे उपक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोल्डस्ट हाय, वाशी अशा प्रकारच्या संधी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतील जेणेकरून शेतकरी आणि ग्राहक थेट जोडले जाऊन एकमेकांना पूरक वातावरण तयार होईल आणि चांगला व्यापार होईल. शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळू शकेल. ऑरगॅनिक फार्मर्स मार्केट च्या माध्यमातून स्थानिक समुदायांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच चांगल्या व्यापाराला चालना देणे, हे उद्दिष्ट आहे. असे मांजरा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नागरिकांना आनंद वाटेल अशाप्रकारे नवी मुंबईचे चित्र बदलून टाका -राजेश नार्वेकर