हभप निवृत्ती महाराज देशमुख यांजकडून नवी मुंबई मधील डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांच्या कार्याचे कौतुक

मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप

उरण : वै.इंदुबाई काशिनाथ देशमुख व वै. काशिनाथ नाना देशमुख यांच्या स्मृती दिना निमित्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर महाराज) यांच्या निवास स्थानी संत निवास ओझर खुर्द ता. संगमनेर, जि.अहमदनगर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील उलवे केमिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सीमा सुभाष पाटील व श्री समर्थ कृपा मेडिकलचे प्रोपाइटर चैतन्य गोवर्धन पाटील (चिर्ले -उरण) यांच्या माध्यमातून मोफत, आरोग्य तपासणी शिबीर व मोफत औषध वाटपचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजाराहून अधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी उच्च रक्तदान मधुमेह तपासणी, रक्त तपासणी, अस्थीरोग तपासणी, इसीजी तपासणी, ऑक्सीजन लेवल, त्वचा रोग तपासणी करण्यात आली.नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. या आरोग्य शिबीरात गोरगरिब गरजूनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याने महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्येष्ठ प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर महाराज )यांनी उलवे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सीमा सुभाष पाटील व श्री समर्थ कृपा मेडिकल (चिर्ले -उरण)चे चैतन्य गोवर्धन पाटील तसेच नवी मुंबई मधील डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्थानिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑरगॅनिक फार्मर्स मार्केटचे आयोजन