महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन उपक्रमांतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोंकण भवनातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव सामिती मार्फत राबविण्यात आलेल्या एक वही एक पेन या उपक्रमांतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल, गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.  

 कोकण भवन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्तीक जयंती उत्सव सामितीच्या वतीने सामाजिक बांधीलकीची कामे नेहमीच केली जातात. त्याचाच एक भाग म्हणून समिती मार्फत एक वही एक पेन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कोकण भवन मधील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी समाजातील आर्थिकदृष्टया दूर्बल आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी वस्तू सदीच्छेने दिल्या. समितीमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून कोकण भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱयांसोबतच त्यांच्या नातलगांनी देखील या उपक्रमासाठी आपले योगदान दिले आहे. या उपक्रमांतर्गत गोळा झालेल्या वस्तु डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटण्यात आल्या.  

या उपक्रमातंर्गत समितीच्या वतीने पनवेलच्या कै.रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या आदिवासी कर्णबधिर/मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. 2006 साला पासून कार्यरत असलेल्या या संस्थेला शासनाचे अनुदान मिळालेले नाही. मनोज कुरुळकर हे स्वखर्चातून ही संस्था चालवत आहेत. संस्थेतील सर्व विद्यार्थी आदिवासी असून त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थित हालाखीची आहे. या संस्थेमुळे या विद्यार्थ्यांना विनामुल्य शिक्षण घेणे शक्य झाले आहे. कोंकण भवन मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्तीक जयंती उत्सव सामितीचे अध्यक्ष नरेश वाघमोरे, सचिव प्रविण डोंगरदिवे, सदस्य अजित न्यायनिर्गुणे, जनाबाई साळवे, बाबासाहेब मोगले, विनोद वैदू, म्हसूरक आणि इतर सदस्यांनी स्वत:प्रत्यक्ष या संस्थेतील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हभप निवृत्ती महाराज देशमुख यांजकडून नवी मुंबई मधील डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांच्या कार्याचे कौतुक