भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या भक्तीभावाने संपन्न

उरण : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण जिल्हा रायगड. या शैक्षणिक संकुलात 6 डिसेंबर हा दिवस भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, कामगार नेते  सुरेश पाटील  हे लाभले होते त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश तसेच त्यांच्या त्यागमय जीवनाची विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात ओळख करून दिली.  या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. विद्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन केले गेले. या कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीचे माजी सभापती  नरेश घरत, कामगार नेते मधुकर पाटील, रघुनाथ ठाकूर, सुभाष घरत, बाबूराव मढवी, कामगार नेत्या श्रीमती मनीषाताई म्हात्रे व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते . रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक  नुरा शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बोधमय चरित्र विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस.यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कॅन्सर पिडीतांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संकल्प सेवा समिती तर्फे प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले होते त्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक घरत पी.जे यांनी केले आणि विद्यालयामार्फत मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण न फिटणारे -डॉ.भालचंद्र मुणगेकर