क्रेडाई बीएएनएम-रायगड तर्फे प्रॉपर्टी एवस्पोचे आयोजन

नवी मुंबई ः क्रेडाई आणि बीएएनएम-रायगड यांच्या वतीने येत्या ९ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत कामोठे मधील खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर प्रॉपटी एवस्पो-२०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये नवी मुंबईतील शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या १९ लाखांच्या घरांपासून ते उच्चभ्रू  लोकांसाठी अलिशान आणि महागड्या ३-४ कोटींपर्यंतच्या सदनिका विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती क्रेडाई आणि बीएएनएम-रायगडचे अध्यक्ष जितू जगवानी यांनी दिली.

प्रॉपटी एवस्पो-२०२२च्या अनुषंगाने क्रेडाई आणि बीएएनएम-रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच वाशीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी जितू जगवानी यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाची माहिती दिली. याप्रसंगी क्रेडाई आणि बीएएनएमचे मार्गदर्शक वसंत भद्रा, भुपेंद्र शहा, सेक्रेटरी चिराग शाह, प्रॉपर्टी प्रदर्शनाचे प्रमुख मनिष रामजीवानी, विघ्नेश पटेल, हर्निश कारिया, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

दि क्रेडाई बीएएनएम-रायगड बिल्डर्स वेल्फेअर असोसिएशन गेल्या ५ वर्षांपासून प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करीत आहे. त्यानुसार यंदाचे सहावे प्रॉपर्टी प्रदर्शन ९ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीर कामोठे मधील खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी यंदा सिटी ऑफ ड्रिम्स असे घोषवावय ठेवण्यात आले आहे.

९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे उद्‌घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी क्रेडाईचे ब्रॅन्ड ॲम्बेसिडर सिने अभिनेते सुनील शेट्टी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुवत गणेश देशमुख, आदि उपस्थित राहणार आहेत. सदर प्रॉपर्टी प्रदर्शनात पामबीच-सानपाडा, एनआरआय, नेरुळ, उलवे, पुष्पकनगर, द्रोणागिरी, रोहिंजण, कर्जत, तळोजा,  खोपोली, नेरळ, आदि ठिकाणचे गृहप्रकल्पांतर्गत निर्माण झालेली घरे विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याचे क्रेडाई बीएएनएम-रायगडचे सेक्रेटरी चिराग शहा यांनी सांगितले.

प्रॉपर्टी प्रदर्शनात ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध होणाऱ्या तीन हजार घरांपैकी आपल्या स्वप्नातील घर विकत घ्ोण्याची संधी आहे. त्यासाठी शेकडो नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रदर्शनात २०० हुन अधिक गृहप्रकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या प्रदर्शनात किमान ५०० घरांची बुकींग ग्राहकांकडून अपेक्षित आहे. तसेच घर घ्ोणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
-वसंत भद्रा, संचालक-प्रतिक इंटरप्रायजेस.

प्रॉपर्टी प्रदर्शनात १९ लाखांपासून ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंतची अलिशान घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना कोणकोणत्या सुविधा घरांमध्ये देणार आहेत, त्याची माहिती आणि सादरीकरण असेल. याशिवाय प्रदर्शनस्थळी काही नामांकित वित्तीय संस्थांचे स्टॉल्स देखील असणार आहेत. -जितू जगवानी, अध्यक्ष-क्व्रेडाई बीएएनएम-रायगड. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठ्या भक्तीभावाने संपन्न