‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्युट'चा सुदृढ आरोग्य उपक्रम
नवी मुंबई ः योग प्रशिक्षण मध्ये अग्रेसर असलेल्या ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्युट'च्या वतीने नवी मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा येत्या २४ डिसेंबर रोजी वाशी, सेक्टर-१५ए मधील बुध्द प्रतिष्ठान येथे पार पडणार आहे.
योगाची आवड लहान मुले, तरुण, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्युट'च्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय योग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ‘इन्स्टिट्युट'च्या संचालिका योगगुरु डॉ. रिना अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब चॅम्पियन्सचे चार्टर्ड अध्यक्ष डॉ. प्रताप मुदलियार आणि ‘बुध्द प्रतिष्ठान'चे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी विशेष सहकार्य केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी ८०८०२१२८५१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्युट'च्या माध्यमातून योगाचा प्रसार करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम सुरू असतात. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीवर योग स्पर्धांचे अयोजन केले जाते, त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतो. यंदा आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये योग शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि योग प्रशिक्षण केंद्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टिट्युट'च्या संचालिका रिना अग्रवाल यांनी केले आहे.