महापालिका रुग्णालयात एनआयसीयू, लेबर वॉर्ड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने महापालिका रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग (ऱ्घ्ण्ळ) आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरुळ आणि ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये कार्यरत असून बेलापूर येथे माता-बाल रुग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्डची वाढती गरज लक्षात घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेडस्‌च्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे.

यामध्ये सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील ९ एनआयसीयू बेडस्‌ मध्ये भर घालत २४ बेडस्‌, माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय-नेरुळ येथील ९ एनआयसीयू बेडस्‌ची संख्या वाढवून २४ बेडस्‌, राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील १० एनआयसीयू बेडस्‌ची संख्या वाढवून २२ बेडस्‌ तसेच माता-बाल रुग्णालय बेलापूर येथील ४ एनआयसीयू बेडस्‌ची संख्या वाढवून १२ बेडस्‌ अशाप्रकारे आधीच्या एकूण ३२ एनआयसीयू बेडस्‌ मध्ये ५० बेडस्‌ची भरीव वाढ करीत सद्यस्थितीत ८२ एनआयसीयू बेडस्‌ कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

अशाप्रकारे नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्डमधील बेडस्‌ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जास्तीत जास्त नवजात शिशुंवर उपचार करणे शक्य होत आहे. नवजात अतिदक्षता विभागात वार्मरचा उपयोग प्रसुती कक्षात सुरुवातीच्या काळात नवीन जन्मलेल्या अर्भकाची काळजी घेण्यासाठी तसेच २८ दिवसांवरील कमी वजनाच्या बालकांसाठी सुध्दा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फोटेथेरपी मशीन्सचा कावीळची लक्षणे असलेल्या नवजात शिशुंवर उपचार करण्यासाठी उपयोग होत आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयामध्ये मागील ४ महिन्यात २७६ नवजात शिशुंवर उपचार करण्यात आले आहेत. यातील १ कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या ३ आणि १ ते १.२ कि.ग्रॅ. वजनाच्या ९ अशा १२ नवजात शिशुंवर उपचार करुन त्यांच्या वजनात वाढ करण्यात आली आहे. हृदयाशी संबंधित आजार असलेल्या २ शिशुंवर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कमी दिवसांच्या ६० बाळावर (ज्ीाूीस् ंींगे) एमीा्‌ ीह्‌ ऊीाीूसहू Rाूग्हदज्ीूप्ब् दि ज्ीास्ीूल्ीग्ूब् (Rध्झ्) उपचार करुन त्यांना बरे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर विविध आजारांकरिता रुग्णालयात दाखल झालेल्या शिशुंवर उपचार करण्यात आलेले आहेत. या कार्यवाहीमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. उध्दव खिल्लारे, बालरोग तज्ञ डॉ. माधवी इंगळे आणि प्राध्यापक डॉ. संध्या खडसे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

महापालिकेच्या चार रुग्णालयांतील नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड सुविधांमध्ये ५० बेडस्‌ची मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने तेथील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण झाले आहे. यामुळे अधिक नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होत आहे.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ