उलवे नोड मधील रहिवाशांना अखेर १७ वर्षांनी मिळणार हक्काची स्मशानभूमी  

पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवेशद्वार असलेल्या उलवे नोड मधील नागरिकांना मागील १४ ते १५ वर्षांपासून स्मशानभूमी तसेच दफनभूमीची व्यवस्था ‘सिडको'द्वारे कडून करण्यात आली नव्हती. मात्र, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी सिडको प्रशासन तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्याबरोबर सातत्याने चर्चा आणि पाठपुरावा करुन अखेर सिडकोकडून उलवे सेक्टर-१४ मध्ये अडीच हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड स्मशानभूमी तसेच दफनभूमी उभारण्यासाठी मंजूर करण्यात यश मिळवले. जवळ जवळ दिड कोटी रुपये खर्चाच्या स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. महेंद्र घरत यांच्या प्रयत्नांमुळे उलवे नोड मधील रहिवाशांची स्मशानभूमी आणि दफनभूमीची समस्या मार्गी लागली आहे.

यापूर्वी देखील नेरुळ येथील आगरी-कोळी भवनाच्या धर्तीवर उलवे मध्ये भवन व्हावे यासाठी कामगार नेते महेंद्र घरत यांनी ‘सिडको'कडे सतत पाठपुरावा केला होता. महेंद्र घरत यांनी सिडको प्रशासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उलवे नोड येथे भुमीपुत्र भवन उभारण्यात आले आहे. उलवे नोड मध्ये भुमीपुत्र भवन उभारण्यात महेंद्र घरत यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी लढणारे, प्रकल्पग्रस्त गावांमध्ये सिडकोकडून विविध योजना राबविणारे महेंद्र घरत एकमेव नेते आहेत, असा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

दरम्यान, महेंद्र घरत यांच्या पाठपुराव्यामुळे उलवे नोड मधील रहिवाशांना अखेर १७ वर्षांनी मिळणार हक्काची स्मशानभूमी मिळणार असल्याने उलवे नोड मधील नागरिक त्यांचे आभार व्यवत करीत आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका रुग्णालयात एनआयसीयू, लेबर वॉर्ड पूर्ण क्षमतेने कार्यान्वित