महावितरण भांडुप परिमंडल मुख्य अभियंतापदी सुनील काकडे

नवी मुंबई ः ‘महावितरण'च्या अहमदनगर मंडळ येथे कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता सुनिल काकडे यांची पदोन्नती होऊन त्यांची भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली. २ डिसेंबर रोजी कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनिल काकडे यांनी मुख्य अभियंता पदाचा पदभार स्वीकारला.

मुळचे औरंगाबादचे रहिवासी असलेले सुनिल काकडे यांनी आपल्या सेवाकाळात ‘महावितरण'मध्ये विविध महत्वाच्या पदावर काम केले आहेत. काकडे २००६ साली थेट निवड प्रक्रियेतून औरंगाबाद येथील ४०० केव्ही संवसु मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून  रुजू झाले. त्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता म्हणून धुळे, चाळीसगाव, नाशिक आणि औरंगाबाद अशा विविध ठिकाणी चांगली कामगिरी बजावली आहे. सन २०१७ साली पदोन्नतीवर ते अधीक्षक अभियंता म्हणून कल्याण मंडल-१ येथे सेवा बजाविली आहे. भांडुप येथे रुजू होण्यापूर्वी काकडे
अहमदनगर मंडल येथे कार्यरत होते.

भांडुप परिमंडलामध्ये तत्पर आणि गतिमान सेवेतून उत्कृष्ट तसेच अखंडीत ग्राहक सेवेला प्राधान्य देण्यात येईल. ‘महावितरण'च्या विविध योजना आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच महसूल वाढीसाठी सामुहिक प्रयत्न करण्यात येतील. -सुनील काकडे, नवनियुवत मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल-महावितरण.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महापालिकेतील प्रकल्पग्रस्त कर्मचारी सेवेत कायम होण्याचा मार्ग सुकर