अनधिकृत चर्चवर महापालिकेने फिरवला बुलडोझर

नवी मुंबई -: मुलींवर लैंगिक अत्याचार घडलेल्या  सीवूडमधील  वादग्रस्त अनधिकृत चर्चवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजप प्रदेश महिला अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे २८ नोव्हेंबर रोजी केली होती. या मागणीची दखल घेत मनपा अतिक्रमण विभागाने शुक्रवारी या चर्चवर बुलडोझर फिरवून तोडक कारवाई केली.

सिवुड येथील बेथल गॉस्पेल चर्च मध्ये  मुलींवर तेथील पाष्टर कडून लैंगिक  केल्याची घटना घडली होती. याबत एन आर आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र सदर चर्च/आश्रम शाळा ही पूर्णपणे अनधिकृत रित्या चालवले जात होती. त्यामुळे हे चर्च /आश्रम शाळा तोडण्याबाबत मनपा अतिक्रमण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती आणि यावर कारवाई होत नाही  म्हणून भाजप प्रदेश महिला अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी २८ नोव्हेंबर रोजी सदर ठिकाणी स्थळ पाहणी करून माहिती घेतली असता सदर चर्च वर कारवाई करण्यास मनपा अतिक्रमण उपायुक्त आडकाठी आणत असून  या अनधिकृत चर्चला खतपाणी घालत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे या चर्चवर  व चर्चला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे  केली होती. या मागणीची दखल घेत मनपा  आयुक्तांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने शुक्रवारी या चर्चवर बुलडोझर फिरवून तोडक कारवाई केली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील ३७ हजार नोंदीत रिक्षांपैकी केवळ १२ हजार रिक्षांचे मीटर रिकलीब्रेशन पूर्ण