ऐरोली खाडीकिनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन

नवी मुंबई ः गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबई, उरणसह मुंबई शहरातील समुद्र, खाडी किनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचे आगमन होत आहे. नवी मुंबई मध्ये तर ऐरोली, वाशी, नेरुळ, करावे, एनआरआय येथील खाडीकिनाऱ्यावर हजाराेंच्या संख्येने प्लेमिंगोचा वावर वाढल्याने नवी मुंबई शहर पलेमिंगो सिटी म्हणून गणले जात आहे. ‘पलेमिंगो सिटी'च्या अनुषंगाने महापालिकेने तर लाखो रुपये खर्च करुन जागोजागी पलेमिंगो पक्षांचे शिल्प उभारुन स्वच्छ सर्वेक्षण मध्ये त्याचा समावेश केला आहे. अशा या परदेशी पाहुण्यांचे ऐरोली खाडीकिनारी आगमन झाले असून लवकरच हजारो पलेमिंगो पक्षी नवी मुंबईत दाखल होणार असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले.

नवी मुंबईत ऐरोली खाडीकिनारी पलेमिंगोचे आगमन झाले असून हळूहळू इतर भागात देखील पलेमिंगो दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईत पलेमिंगो पक्षांच्या येण्याला सुरुवात झाली असल्याने पुढील आठवड्यात सागरी जैवविविधता केंद्रातील बोटींग सफर सुरु होणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वास्तविक पाहता नोव्हेंबर महिन्यामध्ये पलेमिंगो पक्षाच्या आगमनाची चाहुल लागते. मात्र, यंदा नवी मुंबई शहरात पलेमिंगो उशिराने दाखल होत आहेत. गुजरात मधील कच्छच्या भागातून हजारो कि.मी.चा प्रवास करुनन परदेशी पक्षी समुद्रकिनारी किंवा पाणथळ भागात येत असतात. तसेच नोव्हेंबर पासून जून महिन्यापर्यत ते नवी मुंबई, उरण आणि मुंबईच्या खाडीकिनारी वास्तव्यास असतात. यावर्षी पलेमिंगो पक्षांचे उशिरा आगमन झाले आहे. ऐरोली खाडीकिनारी पलेमिंगो पक्षांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत चर्चवर महापालिकेने फिरवला बुलडोझर