‘गोवर'चा प्रभाव रोखण्यासाठी महापालिका ॲवशन मोडवर

नवी मुंबई ः लसीकरण गोवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाय असून त्यादृष्टीने अधिक व्यापक स्वरुपात लसीकरणावर भर द्यावा. गोवरचे रुग्ण आढळत आहेत अशा गोवर प्रभावित क्षेत्रात अधिक लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच नागरिकांनीही आपल्या ६ महिने ते ५ वर्षाआतील बालकांचे लसीकरण करुन घ्ोण्याचेे आवाहन केले आहे.
विविध शहरांमध्ये गोवरचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका नियमित लसीकरण टास्क फोर्सची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका क्षेत्रातील गोवर स्थितीची सविस्तर माहिती घेत नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी अधिक गतिमानतेने कृतीशील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सदर बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच ‘जागतिक आरोग्य संघटना'चे विशेष समन्वयक डॉ. अरुण काटकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, बालरोग तज्ञ संघटनांचे पदाधिकारी, महापालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीमध्ये डॉ. अरुण काटकर यांनी गोवर रुबेला दुरीकरण करण्याकरिता गोवर आजार, शाळांमार्फत करावयाच्या उपाययोजना, केंद्रिय समितीची भेट अणि शिफारशी याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी महापालिका क्षेत्रातील गोवर रुबेला आजाराबाबची स्थिती आणि उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

नवी मुंबईमध्ये सुरुवातीपासूनच सातत्याने लसीकरण सुरु ठेवल्याने गोवर बाधितांचे प्रमाण काहीसे मर्यादित असल्याचे दिसून येते. महापालिका क्षेत्रात ११ ठिकाणी गोवरचा प्रभाव दिसून आला असून त्यामधील ३ क्षेत्रातील प्रभाव खंडीत करण्यात आला आहे. उर्वरित ८ क्षेत्रांपैकी जुहूगांव, सीबीडी-बेलापूर, करावे, पावणे या नागरी आरोग्य केंद्र परिसरातील ४ क्षेत्रे गोवर प्रभावित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात येऊन त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या आदेशानुसार गोवरचा नवीन रुग्ण आढळल्यास त्या भागात ९ महिने ते ५ वर्ष वयाच्या बालकांना मिझेल रुबेलो लसीचा १ अतिरिक्त डोस देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार जुहूगांव, सीबीडी-बेलापूर, करावे, पावणे या चार नागरी आरोग्य केंद्रांच्या गोवर प्रभावित परिसरात एमआर लसीचा १ अतिरिक्त डोस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे जुहूगांव, सीबीडी-बेलापूर, करावे या ३ क्षेत्रातील ६ महिने ते ९ महिने वयाच्या बालकास एमआर लसीचा झिरो डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढील काळात अशा प्रकारची गोवर प्रभावित क्षेत्रे आढळून आल्यास त्या ठिकाणीही याच निकषानुसार कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली.

या मान्यतेस अनुसरुन नागरी आरोग्य केंद्र, जुहूगांव, सीबीडी-बेलापूर, करावे, पावणे यांच्यामार्फत आपापल्या गोवर प्रभावी परिसरात अतिरिक्त डोस देण्याबाबतची तयारी पूर्ण झाली असून ६ महिने ते ९ महिने वर्षाआतील ८४५ बालके आणि ९ महिने ते ५ वर्ष वयाची १३०९८ बालके असे एकूण १३९४३ बालकांचे उदिष्ट नजरेसमोर ठेवून १ डिसेंबर रोजी २४, २ डिसेंबर रोजी २९ आणि ३ डिसेंबर रोजी ३० अशाप्रकारे आगामी ३ दिवसात ८३ अतिरिक्त लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे.    

गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळयांची जळजळ, चेहऱ्यावर आणि शरीरावर लाल सपाट पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसानंतर गोवरची लक्षणे दिसून येत असून लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता महापालिकेच्या नजिकच्या नागरी प्राथमिक केंद्राला अथवा महापालिका रुग्णालयाला भेट द्यावी. त्याचप्रमाणे गोवरचा उद्रेक प्रतिबंधासाठी आपल्या घरांना भेटी देणाऱ्या महापालिका आरोग्य विभागाच्या स्वयंसेवकांना सत्य माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करावे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली खाडीकिनारी परदेशी पाहुण्यांचे आगमन