महापालिका आस्थापनेवरील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर करार पध्दतीवर काम करणाऱ्या विविध संवर्गातील नवी मुंबई प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेमध्ये घेण्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने तयार करुन तो राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावा, अशी मागणी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांची ३० नोव्हेंबर रोजी मुख्यालयात भेट घेऊन त्यांना सदर मागणीचे निवेदन दिले. नवी मुंबईतील जवळपास १२६ कर्मचारी करारपध्दतीवर ६ महिन्यांच्या नियुक्ती आदेशान्वये किमान वेतनावर गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेमध्ये विविध संवर्गात तुटपुंज्या पगारामध्ये अविरत सेवा बजावित आहेत. बहुतांश कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी नोकरी करण्याचे वय देखील निघून गेलेले आहे. सर्व कर्मचारी महापालिकेमध्ये प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असून सद्यस्थितीत महापालिकेमध्ये गेल्या दोन वर्षापासून बहुतांश अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले असल्याने तसेच बहुतांश लिपिक कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिक, कर निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यातआलेली असल्याने लिपिक संवर्गातील बहुतांश पदे रिवत आहेत, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नवी मुंबई शहर वसविताना येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आपल्या १०० % जमिनी दिल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची गरज असताना बारवी धरणग्रस्तांच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये नवी मुंबई महापालिकेमध्ये कायमस्वरुपी थेट नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये विविध संवर्गात कार्यरत असणाऱ्या येथील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना देखील महापालिकेमध्ये कायमस्वरुपी करणे गरजेचे आहे. याकरिता अधिसंख्या पद निर्माण करण्यास मान्यता देण्याची आवश्यकता असून आस्थापना खर्चातून सूट देणे किंवा नवीन आकृतीबंधात सदर पदे मंजूर करुन देणे आवश्यक आहे. विहित मार्गाने निवड प्रक्रिया झालेली नसली तरीही गेली ७-१५ वर्षे सदर कर्मचारी महापालिकेत काम करीत आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून त्यांना कायम करण्यात यावे तसेच शैक्षणिक अहर्ता शिथील करणे गरजेचे आहे, अशी बाब यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आयुवतराजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

सदर गोष्टींचा प्रामुख्याने विचार करुन नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर करारपध्दतीवरील विविध संवर्गातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेमध्ये सामावून घेणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे त्वरित पाठविण्यात यावा, अशी मागणी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविल्यास सदर सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचारी कायमस्वरुपी होण्यासाठी शासनस्तरावर मदत मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सदर पदांना मंजुरी घेईन. अन्यथा येत्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सुचनेद्वारे सभागृहाकडून मान्यता मिळवून घेईन, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हा महामंत्री विजय घाटे, निलेश म्हात्रे, ‘भाजपा युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे उपस्थित होते.

बारवी धरणग्रस्तांच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या आदेशान्वये नवी मुंबई महापालिकेमध्ये कायमस्वरुपी थेट नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबई महापालिकेमध्ये विविध संवर्गात कार्यरत असणाऱ्या येथील प्रकल्पग्रस्त
कर्मचाऱ्यांना देखील महापालिकेमध्ये कायमस्वरुपी करणे गरजेचे आहे. महापालिकेचा प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करुन घेईन अथवा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार.-आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘गोवर'चा प्रभाव रोखण्यासाठी महापालिका ॲवशन मोडवर