प्रा.एल.बी.पाटील यांना साहित्य भूषण पुरस्कार
नवी मुंबई ः पेण, सामाजिक प्रतिष्ठान आणि ओजस प्रकाशन पेण यांच्याकडून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य रायगडभूषण
प्रा.एल.बी.पाटील यांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक म. वा. म्हात्रे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी
सदर समारंभ झाला.
अमृतधारा (कविता) आणि गजा (कथा संग्रह) यांचे प्रकाशन प्रा. एल.बी.पाटील आणि कैलास पिंगळे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संजीवन म्हात्रे, सर्वेश तरे, मोरेश्वर पाटील, प्रकाश पाटील, अवि पाटील, के.एम.माधवी, हरिभाऊ घरत, पिंगळे यांनाही साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. तसेच नेव्ही अधिकारी गणेश पाटील, डी.वाय.पाटील, नम्रता म्हात्रे, अशोक मढवी यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.एल.बी.पाटील यांनी म. वा. म्हात्रे यांचे लेखन अनुभव आणि वास्तवतावादी राहिले आहे. आज सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सत्य मांडणारे असावे. देशात नफरतीचे दूषित वातावरण आहे. त्यावर प्रहार करु या, असे पाटील म्हणाले. यावेळी निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले. किशोर म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले.