वाशीतून सायन-पनवेल हायवेला जोडण्यासाठी आर्म ब्रीजची निर्मिती

वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, कोपरी, एपीएमसी येथून पनवेलचा प्रवास होणार फास्ट

नवी मुंबईः पामबीच रोड वरुन थेट सायन-पनवेल महामार्गावर प्रवेश करणे सोपे आणि जलद होणार आहे. नवी मुंबई महापालिका सायन-पनवेल महामार्गाला पनवेलच्या दिशेने जोडण्यासाठी पामबीच मार्गावर वाशी, सेक्टर-१७ पासून एका आर्म ब्रीजचे काम लवकरच सुरु करणार आहे.

सध्या कोपरखैरणे, तुर्भे, कोपरी, एपीएमसी आणि वाशी येथील वाहनधारकांनापनवेलकडे जाण्यासाठी गजबजलेल्या वाशी मुख्य रस्त्याने, मोराज सर्कल किंवा एपीएमसी मार्गाने जावे लागते. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाशी शहरातील वाहतुकीतून किमान १० ते १५ मिनिटांचा अधिकचा वेळ खर्च करुन मार्गक्रमण करावे लागते. परिणामी, इंधन आणि वेळ खर्ची पडत असल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर पनवेलच्या दिशेने जाण्याकरिता पामबीच मार्गावर वाशी, सेवटर-१७ मधील सिग्नल ओलांडल्यानंतर नाल्यावरुन आर्म ब्रीजची उभारणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण'ने (एमसीझेडएमए) परवानगी दिल्यानंतर सुमारे ९.५० कोटी खर्चाच्या सदर आर्म ब्रीजचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. सदर आर्म ब्रीजमुळे वाशी शहरातून वाशी हायवे अथवा एपीएमी मार्गे पनवेल-सीबीडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांच्या प्रवासाचा किमान १० ते १५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. वाशी आणि तुर्भे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहनधारकांना जलद प्रवेश मिळावा यासाठी आम्ही सदर प्रकल्प हाती घेतला आहे. २९० मीटर लांब आणि ६.५० मीटर रुंदी असणाऱ्या यापुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली ‘महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण'चीे (एमसीझेडएमए)परवानगी मिळाली आहे.

‘एमसीझेडएमए'ने महापालिकेला बॉक्स कल्व्हर्ट डिझाईन न वापरता पिअर सिस्टीम (पाईल्स फाऊंडेशन) वापरण्यास सांगितले आहे. त्यामुळे खाडीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी, प्रस्तावित पुलाला धरुन असलेले खांब असतील. त्यानुसार आम्ही प्रकल्प बदलला असून या योजनेसाठी आयआयटी कडून तपासणी करणार आहोत, असे संजय देसाई यांनी सांगितले.

दरम्यान, आर्म ब्रीज प्रकल्पांमध्ये २१ झाडे बाधित होणार असल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव इंजिनिअरींग विभागातर्फे वृक्ष प्राधिकरणाकडे सादर
करण्यात आला असून त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही..

 ‘महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण'ने (एमसीझेडएमए) आम्हाला या कामासाठी परवानगी दिली आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या सुचनेनुसार आम्ही पिलर उभारणीमध्ये आणि जागांमध्ये बदल केला आहे. आर्म ब्रीज प्रकल्पातील पुलांचा मुख्य पाया पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पूर्ण केले जाती. यानंतर पुलावरील स्लॅबची कामे केली जातील. -संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एवस्प्रेस मार्गावर यावर्षी १६८ अपघात; ६८ जणांचा मृत्यू