महापालिका उपायुवत पटनिगीरे अडचणीत?

उपायुवतांची येत्या ८ दिवसात आयुवतांनी चौकशी करण्याची मागणी

नवी मुंबई ः सीवुडस्‌ मधील बेथेल गॉस्पेल चर्चच्या आश्रमाला महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुवत डॉ. अमरीश पटनिगीरे यांचे अभय आहे. या आश्रम घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आश्रमातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कोणतीच कारवाई झालेली आहे. मी यासंदर्भात शासनस्तरावर मुद्दा उपस्थित करणार आहे. त्यामुळे या आश्रमाला पाठिशी घालणाऱ्या उपायवत पटनिगीरे यांंची येत्या आठ दिवसात चौकशी करावी, अशी मागणी ‘भाजपा'च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, सौ. चित्रा वाघ यांच्या या आरोपानंतर उपायुवत डॉ. अमरीश पटनिगीरे अडचणीत येण्याची शवयता असून आयुवत राजेश नार्वेकर यांनी देखील सदर प्रकरणाची गांभिर्याने चौकशी करण्याचे आश्वासन चित्रा वाघ यांना दिले आहे.

सीवुडस, सेवटर-४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट आश्रमातील मुलींवर तेथील पास्टर राजवुÀमार येशुदासन याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली पास्टर येशुदासन पोलीस कस्टडीत आहे.

‘भाजपा'च्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी २८ नोव्हेंबर रोजी या आश्रमात जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी महापालिका आयुवत
राजेश नार्वेकर यांची मुख्यालयात भेट घेतली. वास्तविक पाहता मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका आणि पोलिसांकडून सदर आश्रम ताबडतोब सील करण्यात आले पाहिजे होते. पण, आजही तेथे सर्रासपणे कामकाज सुरु असल्याचे निदर्शनास आले. गॉस्पेल आश्रम अनधिकृत असून त्यांच्याकडे कोणत्याही परवानगी नाहीत. असे असताना येथील अनधिकृत बांधकामाला फवत नोटीस बजावण्याव्यतिरिवत अतिक्रमण विभागाने काहीच कार्यवाही केलेली नाही. यामध्ये महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुवत डॉ. अमरीश पटनिगीरे यांची भूमिका संशयास्पद मिळत आहे. या चर्चशी डॉ. पटनिगीरे यांच्या पत्नीचा संबंध देखील असल्याने आश्रमावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप सौ. चित्रा वाघ यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा करताना केला.

मुख्य म्हणजे या आश्रमार जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात असून त्याला महापालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे या मिशनरी ट्रस्टची, आश्रमाशी असलेला डॉ. पटनिगीरे यांचा संबंध, आश्रमावर महापालिकेने केलेली कारवाई अशा सर्व प्रकाराची येत्या ८ दिवसात चौकशी करावी, अशी मागणी सौ.चित्रा वाघ यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली. तसेच केलेल्या कारवाईबाबत मी आठ दिवसांनी माहिती घेणार असून शासन स्तरावर देखील या प्रकरणाच्या कारवाईची मागणी करणार असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

याप्रसंगी ‘भाजपा'च्या प्रदेश सदस्या प्रा. वर्षा भोसले, ‘भाजपा'च्या महिला जिल्हा सरचिटणीस सौ. मंगल घरत यांच्यासह इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

गॉस्पेल आश्रम अनधिकृत असतानाही त्यावर महापालिकेकडून नोटीस बजवाण्याव्यतिरिवत कोणतीच कारवाई नाही. जर एखाद्या गरीबाच्या घर, दुकानावर मुदत न देता कारवाई करणाऱ्या महापालिकेने या आश्रमाला अभय कसे दिले. या आश्रमातील अतिक्रमणाला उपायुवतांनीच खतपाणी घातल्याने त्यांच्या चौकशीची मागणी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे व्यवतीशः केली आहे. -सौ. चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्षा-भाजपा महिला मोर्चा.

मी सदर प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करतो.-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदूषण विरोधात खारघरमध्ये निषेध रॅली