प्रत्येकाने संविधान साक्षर होणे आवश्यक आहे- माजी न्यायाधिश बी. एल. वाघमारे 

ऐरोली मध्ये संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

नवी मुंबई : प्रत्येकाला संविधान वाचता आल पाहिजे, संविधान आपल्याला किती समजलेले आहे, हे प्रत्येकाला सांगता आल पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाने संविधान साक्षर होणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांनी ऐरोली मध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. ऐरोली सेक्टर-२ मधील राजरत्न ग्रुपच्या वतीने शनिवारी भारतीय संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर डॉ. विवेक रणपिसे, आनंदा होवाळ, डॉ. प्रकाश सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते होते.

यावेळी पुढे बोलताना वाघमारे म्हणाले, डॉ. आबेंडकरांनी आपल्याला भारतीय संविधान देऊन ७२ वर्षे झाली आहेत, मात्र आपण आजही संविधानिक साक्षर होऊ शकलेलो नाहीत, अशी खंत व्यक्त केली. तसेच आपल्याला संविधान साक्षर होण्यासाठी संविधानिक साक्षरता, संविधानिक जागरुकता आणि संविधानिक संवेदना (स्पीरीट) समजुन घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मात्र आपण या गोष्टी न करता, फक्त बढाया मारण्याचे काम करतो. हे सांगतानाच न्या. वाघमारे यांनी सोप्या भाषेत संविधान साक्षर कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. तसेच आयएएस-आयपीएस कसे व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन तरुणांना केले.

यावेळी डॉ. विवेक रणपिसे, आनंदा होवाळ, डॉ. प्रकाश सावंत, अॅड. पवार व इतर मान्यवरांनी संविधानाविषयी आपले मौलिक विचार मांडले. तत्पुर्वी राजरत्न ग्रुपचे अध्यक्ष विक्रम ढेपे, सम्राट ढेपे, नितीश कांबळे, अक्षय भंडारे, प्रणील कदम, शैलेश वाघमारे व इतर तरुणांनी तसेच परिसरातील महिला व लहान मुलांनी ऐरोलीतून संविधान गौरव रॅली काढून संविधनाविषयी जनजागृती केली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोचे ३०० कोटींचे नुकसान वाचले