कोकण भवन येथे संविधान दिन उत्साहात साजरा

 

नवी मुंबई ः संविधान जागरुकता मोहिमेअंतर्गत २६ नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन'निमित्त कोकण भवन मधील समिती सभागृहात शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत समाज कल्याण मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी प्रस्ताविकेचे वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक आयुक्त (प्रशासन) मनिषा देवगुणे, प्रभारी तहसीलदार (सामान्य प्रशासन) माधुरी डोंगरे, सहाय्यक संचालक अन्न-नागरी पुरवठा (मंत्रालय) सोनवणे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक धर्मराज गोसावी, जनसंपर्क अधिकारी संजय भोसले, विनोद जामनेर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रस्ताविकेच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात
करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह प्रस्ताविकेचे वाचन केले.
संविधान बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने २६ नोव्हेंबर रोजी जागरुकता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत २६ नोव्हेंबर दिनी प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. तसेच या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जाते. सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिन निमित्त २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत समता पर्व उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने मुंबई विभागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या अधिनस्त शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रभात फेरी, संविधान वाचन, व्याख्याने, जाती प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी आदिंसाठी विविध कार्यक्रम, निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभाग मुंबईच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना
कोचुरे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘संविधान दिन'निमित्त महापालिका मुख्यालयात उद्देशिकेचे सामुहिक वाचन