बेलापूर ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवेला आजपासून प्रारंभ
नवी मुंबई ः नवी मुंबई ते अलिबाग आता केवळ सव्वातासात प्रवास सहजशवय होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून नयनतारा शिपींग प्रा. लि. तर्फे बेलापूर जेट्टी ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी (लाँच) सेवा आज २६ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. त्यासाठी २३ नोव्हेंबर पासून या सेवेसाठीच्या ऑनलाईन बुकींगला सुरुवात झाली आहे.
बेलापूर-मांडवा प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० रुपये (एविझवयुटिव्ह वलास) आणि ४०० रुपये (बिझनेस वलास) मोजावे लागणार आहेत. सदर सेवा सुरुवातीला केवळ शनिवार आणि रविवार या दिवशीच उपलब्ध असणार आहे. नयनतारा शिपींग कंपनीच्या माध्यमातून २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. सदर वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालवण्याचा निर्णय महाारष्ट्र मेरीटाईम बोर्डाने घेतला असून लवकरच सेवा बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान देखील सुरु करण्यात येणार आहे. बेलापूर - गेट वे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दुसरीकडे सागरी मंडळाने बेलापूर-मांडवा मार्गावर वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घ्ोतला आहे. त्यानुसार आज २६ नोव्हेंबर २०२२ पासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता सदर वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडवा येथे पोहोचेल. तर संध्याकाळी ६ वाजता मांडवा येथून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूर जेट्टी येथे पोहोचेल. या सेवेसाठीच्या ऑनलाईन बुकींगला २३ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून सुरुवात झाली आहे.
सध्या नवी मुंबईतून अलिबाग येथे रस्ते मार्गाने पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण, या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर ते मांडवा अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे.
दरम्यान, मुंबई ते मांडवा अंतर अतिजलद गतीने पार करता यावे यासाठी १ नोव्हेंबर २०२२ पासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. नयनतारा शिपींग कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठी २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. या वॉटर टॅक्सीला हळूहळू पर्यटक, प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालवण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डाने घेतला आहे. त्यानुसार वॉटर टॅवसी सेवा बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सुरु करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी पर्यटक-प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.