‘महा आवास अभियान २०२०-२१'मध्ये कोकण विभागाची सर्वोत्कृष्ट कामगिरी

केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून कोकण विभाग प्रथम

 नवी मुंबई ः ‘महा आवास अभियान २०२०-२१'मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांपैकी केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून कोकण विभागास प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला.  कोकण विभागाच्या उल्लेखनीय कामामुळे  विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना‘महा आवास अभियान पुरस्कार आणि महा आवास अभियान विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर आणि उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव यांना गौरविण्यात आले.

केंद्र आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करताना गतिमान आि गुणवत्ता आणाण्यासाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्यात ‘अमृत महा आवास अभियान २०२२-२३' या अभियानचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २४ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंत चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झाला. ‘सर्वांसाठी घरे-२०२२' असे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून, राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम योजना अशा विविध गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून त्यांना पुरक पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसारख्या विविध योजना देखील राबविण्यात येत आहेत.

‘महा आवास अभियान २०२०-२१'मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांपैकी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये ‘ठाणे जिल्हा परिषद'ने तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत सिंधुदूर्गच्या कुडाळ तालुक्यातील वाडोस ग्रामपंचायत दुसऱ्या क्रमांकावर होती. राज्य पुरस्कृत आवास योजनेत सर्वोत्कृष्ट जिल्ह्यासाठी ‘रत्नागिरी जिल्हा परिषद'ला दुसरा क्रमांक मिळाला, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत सिंधुदूर्गच्या कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामपंचायत दुसऱ्या क्रमांकावर होती. सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारतीसाठी ठाणे जिल्हयातील भिवंडी तालुक्याच्या चिंचवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला.  सर्वोत्कृष्ट गृहसंकुलासाठी सिंधुदूर्ग जिल्हयाच्या देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला.

कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि सहकारी संस्थांचे सहाकार्य घ्ोणे यामध्ये उल्लेखनीय कामामुळे  कोकण विभागातील ‘पालघर जिल्हा परिषद'ला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. राज्य अभियान कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण मधील सिंधुदूर्ग जिल्हयाच्या जिल्हा प्रोग्रामर श्रध्दा गिरकर, रत्नागिरी जिल्ह्याचे तालुका डेटा एन्ट्री ऑपरेटर अमित सुरेश शिगवण, रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता वेदांगी म्हात्रे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बेलापूर ते मांडवा वॉटर टॅक्सी सेवेला आजपासून प्रारंभ