‘बाबूशेठ फाऊंडेशन'तर्फे किल्ला बनविणे, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

नवी मुंबई ः दिवाळी निमित्त बाबूशेठ फाऊंडेशनच्या वतीने तुर्भे गावामध्ये लहान मुलांसाठी किल्ला बनविणे आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेतील विजेत्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी'चे सचिव तथा ‘बाबूशेठ फाऊंडेशन'चे संचालक डॉ. विनोद बाबूशेठ पाटील, ‘नवी मुंबई युवक काँग्रेस कमिटी'चे सरचिटणीस डॉ. विजय बाबूशेठ पाटील, बबन आत्माराम पाटील, साईनाथबुवा मंगळ पाटील,  प्रकाश पंडीत पाटील, आदि उपस्थित होते.

रांगोळी स्पर्धेमध्ये सौ. तृप्ती राहुल म्हात्रे आणि सौ. नलिनी चिंतामणी पाटील तर किल्ला बनविणे स्पर्धेत संस्कार सुधीर पाटील, चिराग नरेश पाटील, रुद्र परेश पाटील, मानस विजय पाटील, प्रणव प्रकाश पवार, सुजल चिकले, आदेश गायकवाड, आरव चिकले, साईराज चव्हाण, क्रिशांग पाटील, तनुज मिलींद म्हात्रे, देवांग संदीप ठाकूर, अंकीत किरण ठाकूर, ज्ञान संदीप ठाकूर, आदि स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महा आवास अभियान २०२०-२१'मध्ये कोकण विभागाची सर्वोत्कृष्ट कामगिरी