इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण सहभागासाठी नागरिकांना आवाहन

शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्था विषयी नागरिकांचे अभिप्राय अपेक्षित

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेसह वैशिष्टयपूर्ण प्रकल्प, कामांमुळे तसेच दर्जेदार सेवासुविधांमुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध बहुमान, पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये नवी मुंबईकर नागरिकांच्या प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. देशातील एक लक्षणीय शहर म्हणून नवी मुंबईचा सर्वत्र नावलौकिक होत असताना येथील नागरी सुविधांच्या उत्तम दर्जामुळे नवी मुंबईकर रहिवाशी होण्याची इच्छा अनेकजण सोशल मिडीयाच्या विविध प्लॅटफॉर्मवरुन व्यक्त करताना दिसतात.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण-शहरी विकास मंत्रालयच्या वतीने देशातील निवासयोग्य शहरांची स्पर्धा ‘ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स' आयोजित करण्यात आली असून यामध्ये नवी मुंबई शहर पूर्ण क्षमतेने सहभागी झाले आहे. या स्पर्धेअंतर्गत नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (ण्ग्ूग्ैरह झीमज्ूग्दह एल्ीनब्) करण्यात येत असून शहरातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक व्यवस्था अशा विविध बाबींविषयी नागरिकांचे अभिप्राय घेण्यात येत आहेत. सदर अभिप्राय घेण्याकरिता प्ूूज्ः//ंग्ू.त्ब्/३ध्ंज्ध्ी९ अशी लिंक केंद्र सरकार मार्फत उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यामधील १७ प्रश्नांंवर योग्य पर्याय निवडून नागरिकांनी विविध विषयांवर अभिप्राय नोंदवायचे आहेत.

या सर्वेक्षणाची माहिती नागरिकांपर्यंत व्यापक स्वरुपात पोहोचण्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यापूर्वीच अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत दिले होते. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतः तसेच आपले कुटुंबिय यांचे अभिप्राय प्राधान्याने नोंदवावेत. त्याचप्रमाणे क्षेत्रीय स्तरावर सोसायट्या, शाळा-महाविद्यालये, सरकारी तसेच खाजगी आस्थापना, उद्योग, व्यवसाय ठिकाणे येथे भेटी देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या नवी मुंबई शहरविषयी मनात असलेली प्रेमाची आणि अभिमानाची भावना सदर अभिप्रायाच्या स्वरुपात दाखल करण्याविषयी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे सूचित केले होते. याबाबत झालेल्या कार्यवाहीचा विभागनिहाय सविस्तर आढावा आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. तसेच याबाबतची कार्यवाही अधिक व्यापक स्वरुपात आणि गतीमानतेने करण्याचे विभागप्रमुखांमार्फत सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदाला निर्देश दिले.

केंद्र सरकार मार्फत जाहीर करण्यात आलेल्या िंीेा ध्ि थ्ग्न्ग्हु एल्ीनब् मध्ये नवी मुंबई शहराविषयी आणि तेथील सुविधांविषयी अभिप्राय व्यक्त करण्याची एक नामी संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. तरी प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये प्ूूज्ः//ंग्ू.त्ब्/३ध्ंज्ध्ी९ या लिंकवर क्लिक करुन नागरिक अभिप्राय सर्वेक्षण (ण्ग्ूग्ैरह झीमज्ूग्दह एल्ीनब्) यामध्ये भाषा निवडून रेफरल कोड ८०२७८८ टाकावा. त्यानंतर स्वतःचे नाव, आडनाव, नोकरी-व्यवसाय, स्त्री-पुरूष, वय, शिक्षण, राज्य, शहर टाकून १७ प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत आणि आपल्या नवी मुंबई शहराविषयी मनात असलेले प्रेम आणि सार्थ अभिमान व्यक्त करीत नवी मुंबईला देशातील नंबर वन निवासयोग्य शहर बनविण्यासाठी आपले अमूल्य योगदान द्यावे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आरोग्य विभागाचे सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल