पारसिक हिल उतारावर खोदकामासाठी ‘सिडको'चा बिल्डरसोबत करार

नवी मुंबई ः ‘सिडको'ने एका खाजगी बिल्डर सोबत लिव्ह ॲन्ड लायसेन्स करार करत त्याला पारसिक हिलच्या उतारावर वृक्षारोपण करण्याचे काम सोपवले असल्याची बाब पोलिसांनी मिळवलेल्या दस्तऐवजांमधून सिध्द झाली आहे. याबाबत सर्व पर्यावरणवाद्यांनी म्हटलेली पर्यावरणावरची क्रूर थट्टा संज्ञेला ‘सिडको'ने सार्थ केल्यासारखे आहे, असे पर्यावरणवाद्यांनी सांगितले.

 ‘महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग'च्या निर्देशांअंतर्गत पोलीस पारसिक हिलचा उतार खणणे, संरचना आणि महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासारख्या कृतींद्वारे झालेल्या पर्यावरण अधिनियमाच्या उल्लंघनाच्या प्रकरणांची तपासणी करत आहेत. पोलिसांनी स्वतः  ‘सिडको'च्या करार करण्याच्या अधिकृततेवर आणि पारसिक हिलची मालकी नक्की कोणाकडे आहे? याबद्दल प्रश्न केला आहे. या व्यतिरिक्त संबंधित बिल्डरने कराराच्या अटींनुसार आयआयटी मार्फत मातीच्या स्थिरतेचा आणि वादळाच्या पाण्याच्या यंत्रणेचा अभ्यास करणे आवश्यक होते. परंतु, सदर अटीचे उल्लंघन केले  असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले. आता पोलिसांनी सदर दस्तऐवजाची विचारणा केली आहे.

 ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी ‘सिडको'च्या मालकीच्या नसलेल्या मालमत्तेसाठी एखाद्या खाजगी पक्षासोबत अशाप्रकारच्या अवैध लिव्ह ॲन्ड लायसन्स करार करण्याच्या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पारसिक हिलची मालकी वन विभागाकडे असायला हवी, असे कुमार म्हणाले.

सुशोभिकरणाच्या नावाखाली अगदी तात्पुरत्या स्वरुपाच्या संरचना किंवा होर्डिंग्जसाठी देखील कोणतेही खोदकाम न करण्याच्या कराराच्या अटीचे देखील उल्लंघन करण्यात आले आहे. सदर सर्व उल्लंघने लोकांच्या डोळ्यांसमोर सुरु आहेत. सायन-पनवेल महामार्गावर  ‘सिडको' मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर झालेलेे उल्लंघन कुणीही सहज पाहू शकतो. -बी.एन.कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

‘सिडको'चा करार म्हणजे सार्वजनिक उद्वेगानंतर केला गेलेला विचार असून झालेल्या खोदकामावर केलेली सारवासारव आहे. अगोदरच आवश्यक असलेला आयआयटी अभ्यास केला गेलेला नाही. अन्यथा त्यांनी पोलिसांसमोर तो सादर केला असता. सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दिपक गावित एचआरसीसाठी दस्तऐवजांचे संग्रहण करत आहेत. ते वनाधिकाऱ्यांशी देखील बोलणार आहेत. -विष्णू जोशी, संकलक-पारसिक ग्रीन्स फोरम.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षण सहभागासाठी नागरिकांना आवाहन