वाशीत स्वंयसेवी संस्थांचा जागर  

नवी मुंबई ः नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन तयार केलेल्या साथ आओ इंडिया (एसएआय) या व्यासपीठाच्या माध्यमातून समाजातील शांती आणि समृध्दीसाठी तसेच एकतेचे महत्त्व सांगण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून १९ नोव्हेंबर रोजी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी साथ दो इंडिया मोहिमेअंतर्गत वाशीतील शिवाजी चौकात नागरिकांनी समाजात शांती आणि एकता कायम ठेवून समता, बंधुताची लोकशाही मुल्ये जपावीत, असा संदेश दिला.  

नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्था आणि संघटनाचे शेकडो कार्यकर्ते विश्वात शांती आणि एकता कायम रहावी यासाठी साथ दो इंडिया या मोहिमेअंतर्गत वाशीतील शिवाजी चौकात एकत्र आले होते. यावेळी सावली सेवा फाऊंडेशन, जनजागृती विद्यार्थी संघ, कारवान फाऊंडेशन, केबी फाऊंडेशन, सनी फाऊंडेशन आणि सहज योग केंद्राच्या सदस्यांनी पथनाट्य, प्रेरक आणि देशभक्तीपर गाण्यांद्वारे नागरिकांना एकतेचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व संस्थाच्या सदस्यांनी एकता आणि वैश्विक प्रेमाचा संदेश प्रसारित करण्याच्या वचनबध्दतेसह मेणबत्त्या प्रज्वलित केल्या. तसेच समाजात शांती आणि एकता कायम ठेवून समता, बंधुता लोकशाही मुल्य जपण्याचा संदेश दिला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुविधा कामे विहित वेळेत, गुणवत्तापूर्ण करण्यावर भर द्या -राजेश नार्वेकर