सिडकोला पामबीच येथील भूखंडासाठी ५,५४,०८९ रुपये प्रति चौरस मीटर दर प्राप्त

सानपाडा मधील भूखंडाला आजवरची सर्वात जास्त बोली

नवी मुंबई ः नवी मुंबईतील भूखंडांचे दर गेल्या काही दिवसात गगनाला भिडत आहेत. सिडकोच्या ऐरोली, घणसोली, वाशी, नेरुळ, बेलापूर, खारघर मधील काही मोवयाच्या भूखंडांसाठी जास्त रवकमेची बोली प्राप्त झाली होती. त्यामुळे सिडकोच्या भूखंड घ्ोण्यासाठी विकासकांमध्ये देखील स्पर्धा लागलेली पहावयास मिळत आहे. त्यामुळेच सिडको महामंडळाने विविध ठिकाणच्या २८ भूखंड विक्रीसाठी विकासकांना चांगलाच प्रतिसाद लाभला असून सानपाडा मधील भूखंडासाठी आजवरचा सर्वात जास्त दर मिळाला आहे. पामबीच मार्गावरील सानपाडा, सेवटर-२०मधील भूखंडासाठी ५,५४,०८९ रुपये प्रति चौरस मीटर दराने बोली लावण्यात आली. तर सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी असणाऱ्या भूखंडांसाठी सिडकोला कमी दर प्राप्त झाला आहे. दरम्यान, २८ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला १३६५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

सिडको महामंडळाने आपल्या कार्यक्षेत्रातील २८ भूखंडांच्या विक्रीसाठी भूखंड विक्री योजना-३१ जाहिर व्ोÀली होती. या माध्यमातून ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, नेरुळ, वाशी जवळपास ५ हेवटर जागा निवासी आणि व्यावसायिक वापराकरिता उपलब्ध करुन दिली होती. त्यापैकी सानपाडा, सेवटर-२० मधील भूखंड क्रमांक-९ बी या भूखंडाला नवी मुंबईतील आजवरचा सर्वात दर प्राप्त झाला आहे. ५५२६.९४ चौ.मी. क्षेत्रफळाचा सदर भूखंड निवासी आणि व्यावसायिक प्रयोजनासाठी राखीव असून डीपीयुजी वेन्चर द्वारे या भूंखंडासाठी ५,५४,०९८ रुपये प्रति चौ.मी. इतकी बोली लावण्यात आली आहे. त्याखालोखाल शवती पिरामीड (४,७९,५५१ रुपये प्रति चौ.मी.), जय अक्षर इकोशेल्टर (४,२५,७७७ रुपये प्रति चौ.मी.) आणि स्पेस क्रिएशन्स प्रा. लि. (३,६९,०९८ रुपये प्रति चौ.मी.) असे दर सदर भूखंडाला प्राप्त झाले आहेत. सदर भूखंडासाठी १.५ एफएसआय निश्चित करण्यात आला आहे. 

दुसरीकडे सिडकोने विक्रीसाठी काढलेल्या २८ भूखंडांपैकी सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी राखीव असणाऱ्या भूखंडांसाठी सिडकोला कमी दर प्राप्त झाला आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीच्या भूखंडांसाठी ४५,००० ते १,००,००० रुपये प्रति चौरस मीटर इतकी बोली लावण्यात आली आहे. निवासी-व्यावसायिक (रेसिडेन्शियल प्लस कमर्शिअल) भूखंडांसाठी २,३०,००० ते ५,५४,०८९ रुपये प्रति चौरस मीटर असा दर सिडकोला प्राप्त झाला आहे. या सर्व २८ भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला १३६५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

दरम्यान, सानपाडा मधील भूखंडाला मिळालेला ५,५४,०८९ रुपये प्रति चौरस मीटर दर नवी मुंबई मधील आजवरचा सर्वात जास्त भूखंड विक्री दर ठरला आहे. यापूर्वी भूखंड विक्री योजना-२८ मध्ये नेरुळ मधील भूखंडासाठी ३,८५,००० रुपये प्रति चौरस मीटर दराची बोली लागली होती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीत स्वंयसेवी संस्थांचा जागर