सुभाष पुजारी यांची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड

नवी मुंबई ः पुणे येथे घेण्यात आलेल्या ७१ व्या ऑल इंडिया पोलीस गेम-२०२२ मध्ये महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल मिळवून भारतीय  पोलिसांमधील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' असा मानाचा किताब पटकावला आहे. तसेच भारतीय पोलीस सेवेमधील सर्वोत्कृष्ट बॉडीबिल्डर होण्याचा मान मिळविला आहे.  

पुणे येथे घेण्यात आलेल्या ७१ व्या आँल इंडिया पोलीस गेम स्पर्धेसाठी विविध स्पर्धांसाठी ३६ संघाद्वारे २५०० खेळाडंुनी सहभाग नोंदविला. यातील बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी ८० किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल मिळवून भारतीय पोलिसांमधील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन' असा मानाचा किताब पटकावला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.  

यापूर्वी सुभाष पुजारी यांनी जुलै २०२२ मालदिव येथे झालेल्या मिस्टर एशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. तसेच ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले होते. तसेच सलग दोनवेळा भारत श्री आणि महाराष्ट्र श्री किताब सुद्धा त्यांनी मिळवलेला आहे. येत्या ६ ते १२ डिसेंबर दरम्यान थायलंड फुंकेत या ठिकाणी होणाऱ्या मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये सुभाष पुजारी यांची निवड करण्यात आली आहे.  

सुभाष पुजारी यांनी भारतीय पोलिसांमधील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन'चा किताब पटकावल्याने त्यांचे पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच त्यांचे सहकारी मित्र, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी मोहिम सुरू