‘पारसिक हिल'वरील खोदकाम; पर्यावरण उल्लंघन

नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र मानवाधिकार आयोग'ने पारसिक हिल येथील खोदकामांमुळे होत असलेल्या पर्यावरणाच्या उल्लंघनाची दखल घेऊन उच्च शासकीय अधिकारी आणि नवी मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश जारी केले आहे. सीबीडी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक गावीत यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातून एचआरसी आदेश मिळण्याचे सांगितले असून त्यांनी आधीच सदर प्रकरणासंदर्भातील कागदपत्रांचे संकलन करणे तसेच विविध अधिकाऱ्यांकडून अहवाल मिळवणे सुरु केले असल्याचे सांगितले आहे. सदर सर्व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत ‘मानवाधिकार आयोग'ला (एचआरसीला) सादर केले जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील राज्य पर्यावरण विभागाने पारसिक हिलच्या उतारावर खोदण्यासाठी कोणतीही पर्यावरण परवानगी नसल्याची माहिती ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ला दिली आहे. ‘महाराष्ट्र मानवाधिकार आयोग'चे अध्यक्ष न्यायमूर्ती  के. के. तातेद, सदस्य एम. के. सईद यांच्यासह पर्यावरण कार्यकर्त्यांच्या वर्तमानपत्रांमधील बातम्यांच्या आधारावर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून अधिकाऱ्यांकडून झालेल्या हयगयीचा परिणाम काही लोकांच्या मानवाधिकारावर झाला असल्याचा शेरा नोंदविला आहे. ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने याआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पारसिक हिलवरील खोदकामांतर्गत सुशोभिकरणाच्या नावाखाली खोदकाम आणि अज्ञात व्यक्तींद्वारे केले जाणारे खोदकाम याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. तर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही पूर्वेकडे सिडको भवन नजिकच्या पारसिक हिल उतारावर खोदण्याच्या आणि तेथील हिरवाईला जाळण्याच्या
आवश्यकतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार म्हणाले.

दरम्यान, आता राज्य मानवाधिकार आयोग सदर प्रकरणावर योग्य ती कार्यवाही करेल, अशी अपेक्षा बी. एन. कुमार आणि विष्णू जोशी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय संविधानाच्या कलम ५१-ए (जी) अन्वये वन, तळी, नद्या आणि वन्यजीवनासह निसर्गाचे संरक्षण-जतन करणे आणि सर्व सजीवांबद्दल भूतदया दाखवणे प्रत्येक भारतीय नागरीकाचे आद्य कर्तव्य आहे, असे बी. एन. कुमार म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी किमान चार वेळा विविध माध्यमांद्वारे पर्यावरण, शहरी विकास आणि वन विभागाच्या सचिवांना तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सदर गैरप्रकारांकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. पण, तरीदेखील संबंधितांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत वाटते. -बी.एन.कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

पारसिक हिलवरील उतारावर झालेल्या प्रकारानंतर महापालिकेच्या सहाय्यक आयुवत तथा बेलापूर विभाग अधिकारी डॉ. मिताली संचेती यांना देखील पारसिक हिलवर झालेले खोदकाम तसेच झाडे जाळली जाण्याची जागा दाखवली होती. सदर सर्व धक्कादायक आहे. -विष्णू जोशी, पदाधिकारी-पारसिक ग्रीन फोरम.

‘सिडको'ने पारसिक हिलवर २००हून अधिक भूखंडांचे वाटप केले असून त्यापैकी १०० भूखंडांवर रहिवासी आणि व्यावसायिक इमारती उभ्या राहिल्या आहेत. अवजड जेसीबी यंत्रांनी खोदकाम केल्यामुळे दरड कोसळून पारसिक हिलवर दुर्घटना घडण्याची शवयता आहे. -जयंत ठाकुर, अध्यक्ष-पारसिक हिल रहिवासी असोसिएशन.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुभाष पुजारी यांची मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये निवड