‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'मध्ये आरोग्य विभागाची सर्वोत्तम कामगिरी

नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'मध्ये नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने नियोजनबध्द कार्यवाही करत ५ लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली आहे.

१८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, सुरक्षित आणि सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे या उद्देशाने महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी २६ सप्टेंबर २०२२ पासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान' राबविण्यात आले आहे. या अभियान कालावधीत महापालिका कार्यक्षेत्रातील १८ वर्षावरील महिला, माता यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत.

अभियान अंतर्गत महापालिकेला देण्यात आलेल्या १८ वर्षावरील ५ लक्ष १७ हजार ९०१ इतक्या महिलांच्या तपासणीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम महापालिका मार्फत करण्यात येऊन ५ लाख २० हजार ९०१ इतक्या १८ वर्षावरील महिलांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये ५,२,८६८ इतक्या महिलांच्या उंची आणि वजनाचे मोजमाप करण्यात आलेले आहे. तसेच ५,२,४२७ महिलांची रक्तदाब तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या ४६३० लाभार्थी महिलांवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत. ५५,०२९ महिलांची एचबी तपासणी करण्यात आलेली आहे. २५५८ रक्तक्षय आढळलेल्या महिलांवर उपचार सुरु करण्यात आलेल आहेत. तसेच २०२० मधुमेह निदान झालेल्या महिलांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. अभियानात १५९ दंत रोग तपासणी शिबिरांद्वारे २०,८५८ महिलांची दंत रोग तपासणी करण्यात आली.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'ची माहिती जास्तीत जास्त महिलांना मिळून मोहिमेतील उपक्रमाचा लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य सेविका-सेवक यांच्याद्वाारे घरोघरी जाऊन शिबीरे आणि उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात आली. ए.एन.एम. मार्फत कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी सभांचे नियोजन करण्यात आले. हस्तपत्रके, बॅनर आणि होर्डिंग याद्वारेही दर्शनी ठिकाणी प्रसिध्दी करण्यात आली.

२६ सप्टेंबर पासून महापालिका रुग्णालये आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कार्यक्षेत्रात रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता विविध तपासण्या करण्यात आल्या.
दरम्यान, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान'मध्ये शासनाने दिलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जात नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाने नियोजनबध्द कार्यवाही करीत ५ लाख २० हजारांहून अधिक  महिलांची आरोग्य तपासणी करुन अभियानात सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुवतांकडून सायन्स पार्क प्रकल्पाची पाहणी