सुल्जर पंप्स कंपनीतर्फे ७०० गवंडी कामगारांना  बॅग आणि टूलकिट वाटप

नवी मुंबई : ठाणे विभागातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गवंडी  कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी दिघा एमआयडीसी येथील सुल्जर पंप्स इंडिया कंपनी आणि प्रथम सामाजिक संस्था काम करीत आहेत.    या उपक्रमात महिला आणि पुरुष कामगारांना प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण एप्रिल 2022 मध्ये सुरू झाले. प्रशिक्षित कामगारांना प्रमाणपत्र आणि टूल-किटचे वितरण करण्याचा कार्यक्रम  सुल्जर पंप्सच्या दिघा येथील कारखान्यात 16 नोव्हेंबर रोजी पार पडला.‌  ७०० गवंडी कामगारांना  बॅग आणि टूलकिट, मुली आणि युवतींसोबत काम करणाऱ्या महिला स्वयंसेविकांना १७ ई सायकल, ७५ चित्रकारांना पेंटिंग किट देण्यात आले. या साधनांच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, व्यवसाय वृद्धी आणि महिला सक्षमीकरण साध्य होणार आहे.

या कार्यक्रमात रेनहार्ड वॉल्टर(हेड एनर्जी बीयू ऑपरेशन्स, ग्लोबल ऑपरेशन्स),   सुजल शाह (व्यवस्थापकीय संचालक),  गुरुलाल सिंग उप्पल (उपाध्यक्ष - एचआर, आयआर आणि प्रशासन) आणि   अमित सिरोही (उप-सरव्यवस्थापक  एचआर  आणि आयआर)  यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुल्जर कामगार युनियनचे अध्यक्ष रुपेश पवार, अन्य पदाधिकारी तसेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 व्यवस्थापकीय-संचालक शाह याप्रसंगी म्हणाले की, समाजाच्या नेमक्या गरजा ओळखून सुल्जर पंप्स कंपनी सीएसआरच्या माध्यमातून उपयुक्त वस्तूंचे वाटप करत असते.‌ सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न असतो. उपाध्यक्ष  एचआर श्री. उप्पल यांचे यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. भारतामध्ये महिला श्रमशक्ती एकूण श्रमशक्तीच्या फक्त19.70% असून हे प्रमाण अतिशय कमी आहे. सुल्जर पंप्स कंपनी श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याला प्रोत्साहन देते. भारतीय समाजात महिलांचा आदर केला जातो त्याच धर्तीवर श्रमशक्तीमध्ये त्यांचे योगदान वाढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गोवर प्रतिबंधक उपाययोजनांसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन